बुलडाणा, दि. 1: देऊळगांव राजा येथे श्री बालाजी महाराज वार्षिक उत्सव व यात्रा दरवर्षी घटस्थापनेपासून भरविण्यात येते. ही यात्रा दि. 3 ऑक्टोबर ते 25 नाव्हेंबर 2024 पावेतो परंपरागत साजरी करण्यात येणारी बालजी महाराज वार्षिक यात्रा शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहुन परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले.
गुरुवार दि. 3 ऑक्टोबर घटस्थापना, शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर रोजी मंडपोत्सव, दसरा पालखी मिरवणुक दि. 12 ऑक्टोबर मध्यरात्री पासुन ते दि 13 ऑक्टोबर. सोमवार दि. 21 ऑक्टोबर रोजी लळीत उत्सव, दि. 2 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत कार्तिक उत्सव या कालावधीत अटी व शर्तीच्या अधिन राहुन तसेच लोकनाट्य (तमाशा) यांना वगळून उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
अटी व शर्ती याप्रमाणे : यात्रेमध्ये कोणताही व्यवसाय करावयाचा झाल्यास संबंधित विभागाची परवानगी घेणे आवश्यक राहील. यात्रेमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मध्यरात्री 12 वाजेनंतर कोणताही व्यवसाय चालू ठेवता येणार नाही. श्री बालाजी संस्थान व्यवस्थापन समिती देऊळगाव राजा यांनी चेंगराचेंगरी सारखा प्रकार होवू नये. जिवित, वित्तहानी होऊ नये या दृष्टीने संस्थानचे वतीने जास्तीत जास्त स्वयंसेवक नेमणे बंधनकारक राहील. लळिताचे दिवशी प्रसाद वाटपाचे वेळी सर्व भाविक हे रांगेत येतील व आवश्यक त्या ठिकाणी भाविकांच्या व्यवस्थेसाठी बॅरकगटींगची व्यवस्था करण्यात यावी. वाहन धारकांना वाहने लावण्याकरिता पार्किंगची व्यवस्था, शिवाजी हायस्कुलच्या प्रांगणात चारचाकी वाहनाची व्यवस्था व नगर परिषद शाळेच्या प्रांगणात करण्यात यावी. त्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. यात्रास्थळी रस्त्यावर अडथळा निर्माण होणार नाही याकरीता आवश्यक तो पालीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. नगर पालिका प्रशासन, पोलीस विभाग, महसुल विभाग बांधकाम विभाग व संबंधित इतर विभाग यांनी दिलेल्या निर्देश पाळणे आयोजन संस्थानास बंधनकारक राहिल. यात्रेतील भाविकांची व्यवस्था व सुरक्षिततेबाबत केलेल्या नियेाजनाची एक प्रत पोलीस विभागाकडून मंजूर करुन घेणे आयोजन संस्थानास बंधनकारक राहील. सर्व सोई सुवधिा पुरविण्याची जबाबदारी आयोजन संस्थानाची राहिल. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी प्रशसनाच्या मागणीप्रमाणे सोयी सुविधा पुरविणे आयोजन संस्थानाला बंधनकारक राहिल. सदर मिरवणुकी दरम्यान भाविक दर्शनासाठी गर्दी करणार नाहीत तसेच मिरवणुकीमध्ये सामील होणार नाही, याबाबतची सर्वोतोपरी दक्षता घेण्याची जबाबदारी आयेाजन संस्थानाची राहील.