तिरोडा,दि.०५ः- तिरोडा तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र बेरडीपार येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी आकस्मिक भेटी देवुन कामकाजाची पाहणी केली.त्यावेळी त्यांचे सोबत तालुका आरोग्य अधिकारी तिरोडा डॉ. दर्शना नंदागवळी व वैद्यकिय अधिकारी डॉ.रजनीश डोंगरे यांचे सह ईतर कर्मचारी उपस्थित होते.
भेटी दरम्यान आरोग्यवर्धिनी केंद्र बेरडीपार येथील प्रसुतीगृह, प्रयोगशाळा, आंतररुग्ण वार्ड, औषधी साठा केंद्र ई.ची पाहणी करुन लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या द्रुष्टीकोनातुन सुधारणा करण्याच्या सुचना वैद्यकिय अधिकारि यांना देण्यात आल्या.त्यात प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता नियमितपणे करणे, सर्व कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी नोंदविणे, बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) दरम्यानच्या वेळेत रुग्णांना वेळेत चांगल्या सोयी देण्यात याव्यात,क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी नियमित गावनिहाय भेटीचे नियोजन करणे,पर्यवेक्षांनी उपकेंद्रांना भेटी देवुन सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेण्यात यावा, हलचल रजिस्टरवर नोंदी करुनच मुख्यालय सोडावे.सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात यावी. कर्मचारी यांनी कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ड्रेस कोड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,जैविक घन कचरा व्यवस्थापन योग्य करणे, जनआरोग्य समीतीच्या सभा नियमीत घेणे, कुपोषित अंगणवाडीतील बालकांचे तपासणी करुन कुपोषित बालकांना श्रेणीनुसार वर्गीकरण करुन आवश्यक असल्यास गोंदिया येथिल एन.आर.सी. केंद्रावर भर्ती करण्याच्या सुचना दिल्या, टेलिकंन्सल्टेशन सेवेचे सामुदायिक आरोग्य अधिकारी मार्फत योग्य नियोजन करणे,गरोदर मातेला प्रसुतीपुर्व व प्रसुतीपस्चात नियमित सेवा देणे, आश्रमशाळेतील मुलांची आरडीके किट ने मलेरिया बाबत तपासणी करणे,आरोग्य विषयक जनजाग्रुती साहित्य लोकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे.
भेटी दरम्यान त्यांचे सोबत राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियंता पवन फुंडे, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक पियुष श्रीवास्तव उपस्थित होते.