
गोंदिया,दि.१०- नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र पालचौकच्या वतीने रेलटोली परिसरातील सार्वजनिक दुर्गा मंड्ळ येथे दि.9 ऑक्टोंबर रोजी नवरात्री उत्सवानिमित्त आरोग्याचा जागरातुन आरोग्य तपासणी शिबीरातुन नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नवरात्रीत्रीत मंड्ळाकडुन विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविणात येत असतात. त्याचाच एक भाग म्ह्णुन कार्यक्षेत्रातील नागरिकांचे आरोग्याच्या दृष्टीकोनातुन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे पालचौक नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आकाश मोटवानी यांनी माहीती दिली आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ.आकाश मोटवानी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक, वयोवृद्ध, महीला यांचे तपासणी करण्यात आली.शिबिरामध्ये आरोग्य तपासणी,रक्त तपासणी,रक्तदाब,मधुमेह,हिमोग्लो
आपल्या रोजच्या आहाराचे नियोजन, आवश्यक आरोग्य चाचण्या व नियमित व्यायाम या गोष्टींचे मानवी जीवनातील महत्त्व वाढत असून प्रत्येकाला आपले आरोग्य सदृढ ठेवणे गरजेचे आहे.हल्ली ताणतणाव वाढला असून आजच्या धकाधकीच्या जीवनात रोगराईचे वाढते प्रमाण व आजारांचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी वेळोवेळी आवश्यक चाचण्या करून घेणे आवश्यक आहे.जेणेकरून वेळीच आजारांचे निदान होऊन त्यावर योग्य औषधोपचार करणे शक्य होत असल्याचे डॉ. मोटवानी यांनी याप्रसंगी माहीती दिली.शिबिरा दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ.आकाश मोटवानी, स्टाफ नर्स नशिमा पठाण, आरोग्य सेवक सागर सिंगाडे,महालॅब फ्लेबेटोमिस्ट मेघा लिल्हारे यांनी आरोग्य सेवा दिली.