गोंदिया,दि.१८ः राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १७ सप्टेबंरला २०२४ रोजी विविध पदाकरीता आरोग्य विभागाच्यावतीने गोंंदिया जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या पदभरतीत अधिकार्यानी आपल्या नातेवाईंकाना नौकरीवर लावून देण्याकरीता शासकीय नियमांना तिलाजंली दिल्याचा प्रकार १४ आॅक्टोंबर रोजी उघडकीस आलेला आहे.विशेष म्हणजे ज्या अधिकार्याचे नातेवाईक मुलाखतीकरीता पात्र होत असतील त्यांच्या निवडीच्यावेळी मुलाखतीच्या पॅनलमध्ये ठेवता येत नाही.परंतु गोंदिया जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.वाघमारे यांनी त्यांच्या पत्नी हा अर्जदार असताना त्यांची निवड करण्याकरीता मुलाखतीच्या पॅनलमध्ये आमगाव येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.राऊत यांचे नाव काढून त्याठिकाणी स्वतःजात आपल्या नातेवाईकाची(पत्नी) निवड केल्याने एकच खळबळ माजली आहे.
विशेष म्हणजे श्यामला संभाजी ढवळे यांनी अर्ज करतांना अनु.जाती व ओपन या दोन प्रवर्गातून अर्ज केले.त्यांच्या अर्जानुसार ३०.६१ टक्के गुण आणि अनुभवाचे ९ टक्के गुण निवड मंडळाने देत ३९.६१ टक्के गुण देत निवड यादीत पहिल्या क्रमांकावर दोन्ही गटात आणले.जेव्हा की कुठल्याही एका गटात त्यांची निवड करायला हवी होती.त्यांच्या दोन अर्जामुळे इतर उमेदवारावर जाणिवपुर्वक अन्याय करण्यात आल्याचे दिसून येत आहे.त्याचप्रमाणे ओपन गटात दिव्या मोरेश्वर सोनवणे हिला ३६.२८ गुण जाहिरात कायद्याच्या ५० टक्के नुसार देण्यात आले.परंतु दिव्या सोनवणे हिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर केलेल्या अंप्रेटिस कार्यकाळाचे गुण मात्र निवड समितीने जाणिवपुर्वक देणे टाळल्याने ओपन गटात दिव्या सोनवणेला पहिल्या क्रमांकावर येण्यापासून व निवड होण्यापासून रोखण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.त्यामुळे या निवड प्रक्रियेची सखोल चौकशी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुन्हा करुन निवड प्रकिया परत करणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे ३ जागेकरीता झालेली( १ ओपन,१ अनु.जाती व १ व्हीजेएनटी) ही निवड प्रकिया १४ आँक्टोंबरला घाईघाईत करुन श्यामला ढवळे यांची नियुक्ती करुन केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांना रुजू ही करण्यात आले.यावरुन रुजू करण्याकरीता झालेली घाई व दिव्या सोनवणे यांचे अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालया केलेल्या कामाचे गुण देणे टाळल्याने या निवड भरतीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवड प्रकियेतील गोंधळाबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना विचारणा केली असता प्रक्रियेच्या छानणी प्रकियेत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आपण ठेवले होते.आणि ज्यांची निवड झाली त्यांचे आडनाव वेगळे आहे.त्यातच डाॅ.वाघमारे यांनी त्या उमेदवार आपल्या पत्नी असल्याची माहिती प्रशासनाला दिलेली नव्हती.जरी त्या त्यांच्या पत्नी असल्या तरी असे असले तरी ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे,त्यांनी तक्रार करावी असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.नितिन वानखेडे यांनी सांगितले.