गोंदिया जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीसाठी 79 अर्जाची उचल

0
213

गोंदिया  दि. 22 :  विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यात 22 ऑक्टोंबर रोजी एकुण 79 अर्जांची उचल करण्यात आली असून आज एकही उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही.

63-अर्जुनी मोरगाव, 64- तिरोडा, 65-गोंदिया, 66-आमगाव या विधानसभा क्षेत्रामध्ये  आजपासुन अर्ज स्विकारण्यास सुरूवात झाली. सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करायचे आहे. 63-अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आज 25 अर्जाची उचल करण्यात आली. 64-तिरोडा  विधानसभा क्षेत्रामध्ये आज 23 अर्जांची उचल करण्यात आली. 65-गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये आज 16 अर्जाची उचल  करण्यात आली व 66-आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आज 15 अर्जाची उचल करण्यात आली.

अ.क्र विधानसभा क्षेत्र अर्जांची उचल नामनिर्देशन प्राप्त
1 63 – अर्जुनी मोरगाव 25 0
2 64- तिरोडा 23 0
3 65 – गोंदिया 16 0
4 66 – आमगाव 15 0
                     एकूण 79 0