33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ अशीही आगळीवेगळी मतदान जनजागृती 

अशीही आगळीवेगळी मतदान जनजागृती 

0
147

blank

खामगाव,दि.२२ः सध्या विधानसभा निवडणूकीचे वातावरण असून मतदानाचा टक्का वाढावा याकरीता निवडणूक आयोगाने शाळेतील शिक्षकांना कामाला लावले आहे.यातच तालुक्यातील  जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कदमापूर ता -खामगाव जि-बुलढाणा येथील शिक्षकांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने मतदान जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.खामगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड यांच्या आदेशानुसार व श्रीधर पल्हाडे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली आगळीवेगळी मतदान जनजागृती करण्यात आली.

विद्यार्थी प्रभातफेरी सोबतच नवनाथांच्या वेषभुषेत शिक्षक कोगदे यांनी गायन करत नागरीकांना मतदान करण्याविषयी मी मतदान करणारंच अशा मजकूर लिहिलेल्या चिठ्ठ्या नागरीकांकडून आपल्या झोळीत घेऊन त्यांना मतदान करण्याविषयी आश्वस्त केले.याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा व एकदा पहाच आगळीवेगळी मतदान जनजागृती.

blank