गोंदिया दि. 26 : जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या हेतूने स्वीपच्या माध्यमातून आज तिरोडा शहरामध्ये शालेय विद्यार्थ्यांकडून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सायकल रॅलीमध्ये शहरातील लोकांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
सायकल रॅलीचे आयोजन उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, गटशिक्षणाधिकारी विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आले. या जनजागृतीमध्ये केंद्रप्रमुख पारधी, केंद्रप्रमुख चौधरी, शहीद मिश्रा, प्राचार्य बारापात्रे, तुरकर, असीम सराफ, सोनी, पटेल, पिपरीवार, कुंभलवार, सुनील शेंडे, संजय कटरे, राहगडले, भाजीपाले, बसोने व इतर अन्य शिक्षकांचे या रॅलीमध्ये मोलाचे सहकार्य यावेळी लाभले.