गोंदिया,दि.२६ः-स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक हे पोलीस ठाणे रावणवाडी हद्दीत आरोपींचा शोध घेत पेट्रोलिंग करित असताना पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून इसम प्रकाश श्रीराम नागेश्वर 26 वर्षे राहणार हट्टाटोला,तालुका किरणापुर, जिल्हा- बालाघाट यास संशयावरून साई ढाबा मुरपार येथून ताब्यात घेतले.असता त्याचे ताब्यातील स्कूल बॅगची तपासणी केली असता बॅग मधील पॉलिथिन मध्ये पिवळ्या धातूचे सोन्या-चांदीचे दागिने किमती 60 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर संबंधात चौकशी केली असता त्याने मुद्देमाल हा बिरसोला येथून चोरल्याचे सांगितले. सदर संबंधात शहानिशा केली असता पो.स्टे रावणवाडी दाखल अपराध क्रमांक- 304/2024 कलम 305 (A) भादवि गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीस मुद्देमालासह पो. स्टे. राणवाडी पोलीसांचे स्वाधिन करण्यात आले आहे.पुढील तपास कायदेशीर कारवाई प्रक्रिया रावणवाडी पोलीस करित आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांचे निर्देश मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, पो.नि. वैभव पवार, पो. स्टे. रावणवाडी यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार- प्रकाश गायधने इंद्रजीत बिसेन, सुबोध बिसेन, दुर्गेश तिवारी, चालक राम खंडारे तांत्रीक सेलचे योगेश रहीले, राकेश येरने, संजू मारवाडे यांनी तसेच पो.स्टे. रावणवाडी येथील पो. स्टाफ ने मोलाचे सहकार्य केले आहे.