35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ राष्ट्रवादी काँग्रेस(अ.प.)गटाला झटका,बाजार समितीचे माजी सभापती कटरे शरद पवार गटात

राष्ट्रवादी काँग्रेस(अ.प.)गटाला झटका,बाजार समितीचे माजी सभापती कटरे शरद पवार गटात

0
274

blank

गोंदिया,दि.२६ः येत्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विचारधारेला मजबूत करण्याकरीता तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेत्यांनी घरवापसी सुरु केली आहे.यामध्ये तिरोडा बाजार समितीचे माजी सभापती वाय.टी.कटरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाअध्यक्ष व माजी जि.प.सदस्य कैलास पटले यांनी आपल्या शेकडो समर्थकासंह माजी मंत्री अनिल देशमुख व माजी खासदार डाॅ.खुशालचंद्र बोपचे यांच्या उपस्थितीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल येथील जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे तिरोडा तालुका अध्यक्ष व माजी जि प सदस्य कैलास पटले,बाजार समितीचे माजी सभापती वाय.टी.कटरे , फंदुलाल पटले,अशोक पटले,सुरेन्द्र लिल्हारे,रामप्रसाद राऊत,तरुण कनोजे,पंकज परिहार,ब्रिजलाल परिहार,छन्ना नागदेवे, मोहन तितिरमारे,रुपेश मदनकर,भरत बुद्धे,लखन कडव,मनोहर पटले,अनिल कनोजे,मेघनाथ अंबुले,शिवशंकर सोनेवाने, राजकुमार रहांगडाले,अनिश सागरे व अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यात सरपंच व उपसरपंच यांचा सहभाग होता. यावेळी नासिर घाणिवाला जिल्हा महासचिव अल्पसंख्यक,मेघा सुनिल बिसेन समन्वयक तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र उपस्थित होते.

blank