गोंदिया,दि.२६ः गोंंदिया शहरातील रामनगर पोलीस ठाणेअंतर्गत येत असलेल्या कटंगीकला येथील एका जमिनीच्या विक्रीत संबधिताची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार खरेदीदारांनी रामनगर पोलिसाकंडे १८ आँक्टोंबरला नोंदवली असून अद्यापही या तक्रारीवर काहीच कारवाई झाली नसल्याने जमीन खरेदीदार अडचणीत सापडले आहेत.तर दुसरीकडे उर्वरीत जमिन खरेदी करणार्या व्यक्तीने आधी जमिन खरेदी केलेल्या खरेदीदारांच्या जागेत कब्जा करण्यास सुरवात केल्याने व जमीन खरेदी प्रकरणात मध्यस्थी करणार्याना हात झटकल्याने संबधिताची फसवणूक झाल्याचे तक्रारदारांचे म्हणने आहे.सविस्तर असे की,कटंगीकला प.ह.न.२६ थाक नं.७४ येथील ०.१० हे आर पैकी आराजी ०.०५ हेक्टर जागा १२ फेबुवारी २०१३ रोजी खरेदी करुन त्या जमिनीची रजिस्ट्री अरुण मार्कंडराव बिसेन न्यु लक्ष्मीनगर गोंंदिया व देवेंंद्र तुळशीराम निमकर न्यु लक्ष्मीनगर गोंदिया यांचे नावे करण्यात आली.त्यानंतर ०.१० हे.आर.पैकी उर्वरीत जागा ०.०५ हे आर ही गैरअर्जदार चितेश नूतनलाल कोल्हे रा.दासगाव(खु.)यांना विक्री करण्यात आली.मात्र गैरअर्जदार चितेश कोल्हे यांनी १७ आँक्टोंबर २०२४ रोजी प्रत्यक्षात अर्जदार यांच्या जागेवर बळजबरीने व अनधिकृत कब्जा करुन ५८०० चौ.फु.पेक्षाही जास्त जागेवर कब्जा केल्याने अर्जदार अरुण बिसेन व देवेंद्र निमकर यांच्या वाटणीतील ५००० चौ.फु.जागेपैकी ८०० चौ.फु.जागा /अवैधरित्या कब्जा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.त्यातही गैर अर्जदार चितेश कोल्हे यांच्या नावे असलेल्या 7/12नुसार ०.०५ हे.जागा नमुद असतांना अर्जदाराच्या जागेवरील कब्जा हटवून न्याय देण्यात यावे अशी मागणी केली आहे.सोबतच मुळ जमिन मालक अनिरुध्द बलीराम वणवे रा.टिबीटोली गोंदिया यांच्याविरुध्द अर्जदारांची फसवणुक केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.