भंडारा ;- दिवाळीतील महत्वपूर्ण दिवस म्हणजे बलीप्रतिपदा शेतकऱ्यांचा राजा बळीराजा या दिवशी बळीराजा पुन्हा आपल्या प्रजेला भेटायला येतो अशी भावना आहे याच पारंपारिक पद्धत कायम ठेवत आज ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने इडा पीडा टळो आणि बळीच राज्य येवो असे म्हणत बळीराजा आगड्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आले.
ग्रामीण भागात बलिप्रतिपदेला माता-बहिणी ‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’ म्हणून घरातील पुरूषांना ओवाळतात.खंडोबा,म्हसोबा,मल्हार, मरतड हे बळीराजाच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम मंत्री होते,असे मानतात. बळीराजाचे राज्य नऊ खंडी होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला ‘खंडोबा’ म्हटले जात असे.आज जसे भारतातील प्रत्येक राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हटले जाते.त्याचप्रमाणे खंडाचा प्रमुख खंडोबा होय. प्रत्येक खंडात छोटे छोटे सुभे (जिल्हे) असायचे.अनेक सुभ्यांचा मिळून एक महासुभा असायचा.या महासुभ्याचा प्रमुख महासुभेदार म्हणजे म्हसोबा होय.त्याचप्रमाणे जिल्ह्याचा प्रमुख जोतीबा,मल्हार व मरतड हे सुरक्षा अधिकारी होते अशी भावना आहे. बलिप्रतिपदेला केवळ बळीराजाचीच पूजा होते,असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांचीही पूजा होते. यावरून बळीच्या राज्यात प्रजा किती सुखी व संपन्न होती.त्यामुळे आता सुद्धा देखील भंडारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बळीराजा दिवस साजरा केला जात असून आज ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने साजरा करीत घोणार गवताची पेंडी तयार करून बळी राजाची प्रतिकृती तयार करण्यात आली आणि पूजा अर्चना करून गावातून मिरवणूक काढून बळी राजाला शेत दाखवत इडा पीडा टळो आणि बळीच राज्य योवो ओबीसीच राज्य येवो अश्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी बळीराजाच्या वेशभूषत भाऊराव ठवकर,ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते,संयोजक जीवन भजनकर,रमेश सेन्द्रे,भाऊ कातोरे,विजय हटवार,रमेश लांडगे,नारायण माने,प्रशांत सुनकीनवार,सेवक ठवकर,जगदीश ठवकर,महिलाध्यक्ष शोभा बवनकर,जिल्हा सचिव प्रा.किरण मते,गीता ठावकर,सुनीता ठवकर, निशा तीतीरमारे,नीता तितिमारे,मंदा ठवकर,प्रशांत हावरे,सुदाम शेंडे,संतोष कातोरे,सचिन शेंडे,किशोर पंचभुदे, नाना ढेगे,शंकर ढेंगे,जगदीश ढेंगे आदी गावकरी उपस्थित होते.