अर्जुनी मोर.-अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्राचे महायुती चे लोकप्रिय उमेदवार राजकुमार बडोले यांचे प्रचारार्थ अर्जुनी मोर. तालुक्यातील सर्वच गावांत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजीत पवार गट, भाजपा, शिवसेना शिंदे गट व मित्र पक्षाच्या पदाधिका-यांनी घरोघरी जावुन शिकवणुक पत्रीका व घोषणापत्रकाचे वाटप करुन महायुतीचे उमेदवार ईंजी. राजकुमार बडोले यांचे घडी चिन्हाची बटन दाबुन निवडुन देण्याचे आवाहण केले.
63 अर्जुनी मोर. विधानसभेची निवडणुक जसजसी जवळ येत आहे तसा निवडणुकीचा माहोल गरम होत आहे. 19 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत काॅग्रेसचे दिलीप बन्सोड,प्रहार संघटनेचे डाॅ.सुगत चंद्रिकापुरे व महायुतीचे राजकुमार बडोले यांचे मधे तिरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत सर्वच उमेदवार आपाअपल्या पध्दतीने प्रचार करीत असले तरी महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी निवडणुक प्रचारात प्रचंड आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपाचे पदाधिकारी राजकुमार बडोले यांचा जोमाने प्रचार करीत आहेत. आज ता.11 नोव्हेंबर रोजी महायुती मधील सर्वच पक्षातील पदाधिकारी यांनी अर्जुनी मोर. तालुक्यातील प्रत्येक घरी जावुन गृहभेटी द्वारे राजकुमार बडोले यांचे साठी मतांचा जोगवा मागितला.व महायुती चे उमेदवार हे घडी चिन्हावर निवडणुक लढवित असुन मतदान मशीनवर प्रथम क्रमांकाची बटन दाबुन राजकुमार बडोले यांना निवडुन देण्याची विनंती केली. या मोहिमेत,भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते,राष्ट्रवादी च्या नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे,उपाध्यक्ष ललीता टेंभरे,ओमप्रकाशसिंह पवार,देवेंद्र टेंभरे, यशकुमार शहारे, राधेश्याम भेंडारकर, अश्विन गौतम, गिताबाई ब्राम्हणकर, राकेश जायस्वाल,मुकेश जायस्वाल, नाशिक शहारे, शालीकराम हातझाडे, दिक्षा शहारे,लोकपाल गहाणे,किशोर तरोणे, हेमकृष्ण संग्रामे,विजयाबाई कापगते, जयंत लांजेवार, होमराज पुस्तोळे, नवल चांडक, नवनीत उईके,देवेंद्र नागपुरे, खुशाल काशीवार, शितलबाई राऊत, नाजुक नाकाडे, लायकराम भेंडारकर, दिपंकर उके, योगेश नाकाडे, प्रकाश गहाणे, नंदु गहाणे,तेजुकला गहाणे, राकेश लंजे, राधेश्याम झोळे, भोजराम रहेले,काशिनाथ कापसे, अशोक मेश्राम, प्रज्ञा डोंगरे, जयश्री देशमुख, पोर्णिमा ढेंगे, उमाकांत ढेंगे, नुतन सोनवाने तसेच शेकडो महायुतीच्ये पदाधिकारी सहभागी झाले होते.