गोंदिया,दि.१३– राज्य सरकारने दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करुन हळूहळू शिक्षणाची दारे बंद करायला सुरवात केल्याने ग्रामीण भागातील गरीबांच्या मुलांचे शिक्षणाची दारे बंद करण्याचे षडयंत्र राज्यातील महाय़ुती सरकारने केल्याची टिका राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहीत पवार यांनी केली.ते तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविकांत बोपचे यांच्या दवनीवाडा व गोरेगाव येथील जाहीर सभेत बोलत होते. गेल्या दहा वर्षापासून सत्ताधारी पक्षाचे आमदार असतानाही रस्त्याच्या कामाकरीता आंदोलन करायची नाटक का आली याचा विचार करुन मतदान करा.गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी मध्यम प्रकल्पाचे पाणी आपल्या सोनी जिल्हा परिषदेच्या भागात गेल्या १० वर्षात पोचले नाही मग कशाचा विकास यानी केला असा सवाल त्यानी केला.जागृती पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणातील लोकाना सोडणार नाही,सोबतच ज्यांचे पैसे बुडाले त्यांचे पुर्ण पैसे व्याजासह मिळवून देण्याकरीता गुड्डू बोपचेंसह गव्हर्नरकडे पाटपुरावा करण्याची ग्वाही पवार यांनी दिली.
या मतदारसंघातील आरोग्याची व्यवस्था ढेपाळली असून ती सुरळीत करायची आहे.दरवर्षी आरोग्यावर २० हजार कोटी खर्चुनही ही अवस्था महायुती सरकारने करून टेवल्याचे म्हणाले.मंचावर उमेदवार रविकांत बोपचे,खासदार प्रशांत पडोळे,शिवसेना जिल्हाध्यक्ष पंकज यादव,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे,माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,गोंदिया तालुका कॉंग्रेस अध्यक्ष रमेश अंबुले,तिरोडा बाजार समितीचे संचालक ओम पटले,बाजार समितीचे माजी सभापती वाय.टी.कटरे,माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पटले,श्रीमती भगत,अण्णा चौधऱी,गोरेगाव तालुका अध्यक्ष जगदिश येरोला,आऱपीआय़ नेते राजकुमार भेलावे,जि.प.सदस्य जितेंद्र कटरे,जिल्हा काँग्रेस विधी आघाडी अध्यक्ष एड.टी.बी.कटरे,बाजार समितीचे संचालक यु.टी.बिसेन,कैलास डोंगरे,राणी अवंतीबाई लोधी महासभेचे अध्यक्ष शिव नागपूरे,स्नेहा कोल्हे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.