- महाबाईक रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
गोंदिया, दि.13 : लोकशाही बळकट करण्यासाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जागरुक व सुजान नागरिक म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.
गोंदिया जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबवित असून 11 ते 13 नोव्हेंबर पर्यंत जिल्हाभरात महाबाईक रॅलीद्वारे मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. SVEEP अर्थात मतदार जाकरुकता व सहभागीता कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती अंतर्गत महाबाईक रॅलीचे गोंदिया शहरात आज सकाळी 11.30 वाजता नविन प्रशासकीय इमारत, आंबेडकर चौक येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत समापन करण्यात आले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण अंबेकर, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, मुख्याधिकारी संदिप चिद्रवार, स्वीपचे सहायक नोडल अधिकारी डॉ.महेंद्र गजभिये व शिखा पिपलेवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
जिल्हाधिकारी प्रजित नायर म्हणाले, लोकशाही प्रणालीत निवडणूक हा महत्वाचा घटक आहे. निवडणूक प्रक्रियेत मतदार हा राजा असतो. त्यामुळे विधानसभेच्या निवडणूकीत नारिकांनी आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा. विशेष म्हणजे जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी मतदान करुन लोकशाही बळकट करण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम म्हणाले, जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप सेल अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून 11 ते 13 नोव्हेंबर पर्यंत जिल्हाभरात महाबाईक रॅलीद्वारे मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर महाबाईक रॅलीत 13 हजार बाईकर्सनी जिल्हाभर फिरुन एकूण 408 कि.मी. भ्रमण केले. यामध्ये 6 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जिल्ह्यातील एकूण 70 ठिकाणी स्वीप अंतर्गत मतदार जागृती करण्यात आली. लोकशाहीमध्ये निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव मानला जातो. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी येत्या 20 नोव्हेंबरला अवश्य मतदान करावे असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक गोरख भामरे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य सहजपणे मिळालेले नाही. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाला खारीज न करता मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. मतदान हा आपला अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करुन येत्या 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान करुन लोकशाही बळकट करावी असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास जिल्हा स्वीप आयकॉन मुन्नालाल यादव, प्रा.शशिकांत चौरे, अशोक मेश्राम यांचेसह तालुका स्वीप नोडल अधिकारी गोंदिया प्रदिप समरीत, स्वीप नोडल अधिकारी तिरोडा विनोद चौधरी, स्वीप नोडल अधिकारी अर्जुनी मोरगाव स्वाती तायडे, स्वीप नोडल अधिकारी देवरी गिरीधर सिंगनजुडे, जिल्हा स्वीप सेलचे केदार गोटाफोडे, चंद्रशेखर दमाहे, विजय लिल्हारे, सचिन धोपेकर, चंदू दुर्गे, संजय टेंभरे, मुकेश वासनिक, श्रीमती पारधीकर, श्रीमती शेट्टे, मोरेश्वर बडवाईक, आर.एस.चव्हाण, अनुप नागपुरे, नितेश मालाधारी, संजयकुमार बिसेन, हर्षकुमार पवार, नरेंद्र गौतम, उमाशंकर पारधी, दिलीप हिरापूरे, तेजलाल भगत, विलास डोंगरे, प्रमोद खोब्रागडे, कुवरलाल रहांगडाले, प्रमोद पटले व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.