गोंदिया शहरात रात्रपाळीत हत्तीरोग नियत्रंणासाठी रात्रकालीन रक्त संकलन मोहीम फत्ते

0
174

गोंदिया- गोरेगाव,तिरोडा व अर्जुनी मोरगाव या चारही तालुक्यात हत्तीरोग संबधाने सामुदायिक औषधोपचार मोहीम दि.26 मार्च ते 5 एप्रिल 2024 दरम्यान राबविण्यात आली होती.मोहिमेदरम्यान लाभार्थ्यानां वयोमानानुसार डि.ई.सी.व अल्बेंडाझॉल गोळ्यांची मात्रा प्रत्यक्ष खावु घालण्यात आली होती.त्या अनुषंगाने सहसंचालक हिवताप,हत्तीरोग व जलजन्य कार्यालयाचे मार्गदर्शक सुचनेनुसार दि.11 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत पोस्ट एमडीए एडिशनल एम.एफ. सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले होते. आपल्या भावी पिढिला हत्तीपाय या आजारापासुन वाचविण्यासाठी हत्तीरोग संबधाने रात्रकालीन रक्त संकलन मोहीम राबविण्यात आली होती.गोंदिया शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केन्द्र अंतर्गत संजय नगर परिसरात आरोग्य विभागातील ह्या कर्मचार्यांनी दिवसपाळीत आपले काम आटोपल्यानंतर रात्रपाळीतसुद्धा आपली ड्युटी बजावुन रात्रकालीन रक्त संकलन मोहीम फत्ते केली.मोहिमेदरम्यान लोकांनी सहकार्य केल्याने कुठलाही त्रास न झाल्याचे पथक कर्मचार्यांनी या प्रसंगी माहीती दिली आहे.
दि. 12 नोव्हेंबर रोजी रात्रकालीन रक्त संकलन मोहीम दरम्यान 26 कर्मचारी यांनी आपली भुमिका चोख निभावली त्यात आरोग्य सेवक मारुती दिपेवाड, जितू बिसवारे,सुरज पीपलशेंडे, आकाश निकोसे,सुनील भांडारकर,सोनल कुमार सावरकर, भालचंद मेश्राम ,सागर शिंगाडे तर आरोग्य सेविका तुपेश्वरी कटरे यांचे सोबत आशा सेविका पुष्पमाला मेश्राम,उषा बोपचे, संगीता रामटेककर,निर्मला तावाडे, संगीता मारवाडे यांचे सोबत नागपुर येथील विभागीय हत्तीरोग पथकाचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बी.एन.भघत,धीरज टेकाळे,जगदीश नसाने व आरोग्य पर्यवेक्षक म्हणुन नंदकिशोर भालेराव यांनी कामकाज केले.
लिम्फॅटिक फायलेरियासिसला कारणीभूत असलेल्या प्रजातींमध्ये मायक्रोफिलेरियल पातळी असते जी रात्रीच्या वेळी शिखरावर असते , म्हणून रात्री 8:00 ते 12:00  दरम्यान हत्तीरोगाचे जंतु लसिकाग्रंथीमधुन रक्तामध्ये जास्त प्रमाणात येतात.एम.एफ.प्रमाण मोजण्यासाठी रक्त नमुने गोळा करण्यात येत असल्याची माहिती नंदकिशोर भालेराव यांनी दिली आहे.
हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा रोग असून वेळेवर ओळखल्यास या रोगाचा प्रभाव लक्षणीय रित्या कमी केल्या जाऊ शकत असतो. फायलेरिया हा डासामार्फत पसरणारा आजार आहे.  मादी क्युलेट्स चावल्याने होतो.हे डास आपल्या घरात जवळील घाण पाण्यात किंवा नाल्यांमध्ये आढळतात.हा रोग जीवघेणा नसतो.परंतु त्याच्या प्रभावामुळे संक्रमित व्यक्ती विकृत होतात.एकदा हत्तीरोग बळावल्यावर उपाय नाही तेव्हा हत्तीरोग होऊ नयेम्हणून डी.ई.सी.व अल्बेंडाझॉल गोळ्यांची फक्त एक मात्रा वर्षातून एकदा सलग पाच वर्षे घेतल्यास हत्तीरोगाचा प्रसार होणे थांबतो. पर्यायाने आपण स्वतः व भावी पिढी हत्तीरोगापासून मुक्त करु शकतो.समाजात नविन रोगी होऊ नये म्हणुन रात्रकालीन रक्त संकलन मोहिम प्रभावी ठरते.
                                  – डॉ.विनोद चव्हाण ,जिल्हा हिवताप अधिकारी