दिव्यांग विद्यार्थ्यांतर्फे मतदान जनजागृती प्रभात फेरी

0
15

गडचिरोली,,दि.15: तालुक्यातील स्व. राजीव गांधी निवासी मूकबधिर विद्यालय, पार्वती निवासी
मतिमंद विद्यालय, स्व. राजीव गांधी निवासी अपंग विद्यालय व व शांतीवन निवासी अपंगाची कार्यशाळा
यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी
वाढविण्याच्या उद्देशाने प्रभात फेरी काढण्यात आली होती.
नागरिकांनी आपला मतदानाचा अधिकार कर्तव्य भावनेने बजवावा यासाठी मतदार जागरुकता
आणि सहभाग कार्यक्रम अर्थात स्वीप अंतर्गत आरमोरी विधानसभा मतदारसंघातल्या दिव्यांग शाळेतील

विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती प्रभातफेरी काढून मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. सर्वप्रथम
मतदान शपथ घेण्यात आली. व नंतर परिसरातील नागरिकांना दिव्यांग विद्यार्थ्यांकडून पत्रक देऊन
जनजागृती करण्यात आली. तसेच मतदान घोषवाक्य देऊन मोठया उत्साहात मतदारांना मतदानाचे आवाहन
करण्यात आले. यावेळी मतिमंद शाळेच्या मुख्याध्यपिका श्रीमती कऱ्हाडे, मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक
श्री कोकुडे, अपंग कार्यशाळेचे मुख्याध्यापक श्री बारसगडे, अपंग विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती दहीकर
हेटी वार्ड येथील पोलीस पाटील रागिणी शेंडे, मुक्तीपथ तालुका समन्वयक भारती उपाध्ये, कार्यकर्ता गुणवंत
चौधरी, आरोग्य प्रबोधिनी कार्यकर्ती आरती पुराम यांनी नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावण्याबाबत
उद्बबोधन केले. दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने
सहभागी झाले होते.