गोंदिया, दि.15 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया व धम्मभंडार विपश्यना सेंटर भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने 11 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत भंडारा कारागृह वर्ग-1, भंडारा येथे ‘‘कैद्यांकरीता विपश्यना शिबीर’’ या राष्ट्रीय मोहिम अंतर्गत विपश्यना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नरेश वाळके यांचे अध्यक्षतेखाली तसेच पॅनल वकील गोंदिया ॲड. एकता गणवीर, भंडारा कारागृहाचे अधीक्षक डी.एस.आडे, धम्मभंडार विपश्यना केंद्र भंडारा येथील सुनिल बागडे, विनोद बोरकर, हरिश्चंद्र दहिवले, राजानंद देशभ्रतार, पवन गेडाम, शोभित रंगारी यांचे उपस्थितीत पार पडला.
यावेळी कैद्यांना मार्गदर्शन करतांना ॲड. एकता गणवीर यांनी आरोपीचे अधिकार आणि प्ली बार्गेनिंग याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच धम्मभंडार विपश्यना केंद्र भंडारा येथील सुनिल बागडे यांनी विपश्यना कशी करावी व त्याकरीता कोणते नियम आहेत याविषयी माहिती सांगितली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नरेश वाळके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कैद्यांकरीता विपश्यना व त्याचे महत्व विशद करुन शिक्षणाची कास का गरजेची आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार डी.एस.आडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया येथील अधीक्षक पी.बी.अनकर, वरिष्ठ लिपीक ए.एम.गजापुरे, कनिष्ठ लिपीक एस.डी.गेडाम, के.एस.चौरे, एल.ए.दरवे, पी.डी.जेंगठे, शिपाई बी.डब्ल्यु.पारधी, आर.ए.मेंढे यांनी मोलाचे सहकार्य केले.