राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्या. भूषण गवई यांची नियुक्ती

0
35

नागपूर  : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या (एनएएलएसए) कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई (Bhushan Gavai) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांनी ही नेमणूक केली असून त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. न्या. गवई (Bhushan Gavai) यांचे नामनिर्देशन ११ नोव्हेंबरपासून प्रभावी असेल, असे न्याय विभागाने प्रसिध्दी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

भारताचे सरन्यायाधीश हे एनएएलएसएचे प्रमुख संरक्षक असतात तर त्यानंतर ज्येष्ठ न्यायमूर्ती हे कार्यकारी अध्यक्ष असतात. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवृत्तीनंतर न्या.संजीव खन्ना सरन्यायाधिश झाले आहेत. यांच्यानंतर न्या. भूषण गवई (Bhushan Gavai) हे सर्वांत ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. न्या. संजीव खन्ना यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याने नियमानुसार हे पद भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दुसर्‍या सर्वाधिक ज्येष्ठ न्यायमूर्तीकडे सोपवणे गरजेचे होते. त्यानुसार न्या. भूषण गवई  हे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती असल्याने त्यांची त्या पदावर नेमणूक करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी ही नेमणूक केली असून विधी व न्याय मंत्रालयाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या नेमणुकीपूर्वी न्या. भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष होते.