अदानी पावर प्लांट तिरोडा येथे मतदान जनजागृती

0
36

गोंदिया, दि.16 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन विविध प्रकारचे कार्यक्रम राबवित असून त्याचाच एक भाग म्हणून  SVEEP अर्थात मतदार जाकरुकता व सहभागीता कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती अंतर्गत 15 नोव्हेंबर 2024 रोजी अदानी पावर प्लांट तिरोडा येथे स्वीप सेलच्या वतीने पथनाट्य व पोवाडा सादर करून मतदान जनजागृती करण्यात आली.

        यावेळी 64-तिरोडा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तिरोडा पुजा गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) तथा एक खिडकी नोडल अधिकारी मानसी पाटील, तहसीलदार तिरोडा नारायण ठाकरे, तहसीलदार गोरेगाव प्रज्ञा भोकरे, जिल्हा स्वीप टीम तर्फे जिल्हा सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी डॉ.महेंद्र गजभिये व शिखा पिपलेवार, नोडल अधिकारी (प्रशिक्षण) केदार गोटेफोडे, नोडल अधिकारी (स्वीप) एम.डी.पारधी, व्ही.एस.चौधरी व स्वीप टीम सदस्य डी.बी.साकुरे, दिलीप हिरापुरे, विलास डोंगरे, टी.बी.भगत, पी.बी.पटले, यु.पी.पारधी, कुवरलाल रहांगडाले, पी.टी.रंगारी, पंकज असाटी, मेरिटोरिअस शाळेचे श्री रत्नाकर व विद्यार्थी, शहीद मिश्रा शाळेचे सुनील शेंडे व एनएसएसच्या विद्यार्थीनी उपस्थित होते. तसेच अदानी पावर प्लांटचे अधिकारी विमल पटेल, पियुष दिगावकर व प्लांटमधील 227 कामगार उपस्थित होते.

       भारताच्या नागरीकांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवावी. आपल्या लोकशाही परंपरांचे जतन करावे. मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात मतदान करावे. निवडणुकांचे पावित्र्य राखावे, प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.