अर्जुनी मोरगाव-विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी एम.मुरुगानंथम यांच्या नियोजनात दि.११ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर रोजी जिल्हाभर मतदारांच्या सहभागाने महाबाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
महाबाईक रॅलीचा प्रारंभ दि.११ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील रावणवाडी येथून सुरुवात झाली. तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, देवरी, सालेकसा, आमगाव भ्रमण करीत रॅली गोंदियाला समापन झाली.महाबाईक रॅलीत जिल्ह्यातील सर्व विभागातील कर्मचार्यांनी उपस्थित राहुन लोकांना मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी सुद्धा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे,आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे,आपला दवाखाना,नागरी आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे,आयुष दवाखाने यांना आपल्या अधिनस्त आरोग्य कर्मचारी,आशा सेविका यांना महाबाईक रॅलीत उपस्थित राहुन आरोग्य सेवा पाठोपाठ जनजागृती करण्याचे आवाह्न केले होते.
दि.13 नोव्हेंबर रोजी मोरगाव अर्जुनी तालुक्यातील जंगलव्याप्त गोठणगाव परिसरातील गावे देवलगाव,येरंडी,बाराभाटी,सुकळी,
महाबाईक रॅली जंगलव्याप्त गोठणगाव परसरात आल्यावर त्यावेळी शिक्षणाधिकारी डॉ.महेंद्र गजभिये,नोडल अधिकारी तायडे मॅडम यांचे उपस्थितीत अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे,प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.देवेंद्र घरतकर,डॉ.विजय राऊत,डॉ.गायकवाड,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रशांत खरात, समुदाय आरोग्य अधिकारी गौरव टेंभेकर,औषध निर्माण अधिकारी मुकुल बडवाईक,आरोग्य सहाय्यक संतोष पारधी व के.एस.कुर्वे,आरोग्य सेवक राजेंद्र वघारे,अमोल मालेकर,सैय्यद,आरोग्य सहायिका डोंगरे,आशा सेविका सविता टेंभुर्णे,भाग्यश्री राणे,प्रमिला पोद्दार,साधना कोडापे,अहिल्या ईस्कापे,आशा गट प्रवर्तक टेंभुर्णे,वाहन चालक खेडीकर, प्रिती म्हसके,परिचर बंडुभाऊ उईके,कोमल शहारे, कुमुद शहारे, आरोग्य सेविका प्रमिला रॉय,स्टाफ ब्रदर चिरायु वावरे यांनी आरोग्य सेवेसोबतच मतदान जनजागृतीवर भर देण्यात आला.