आदिवासी समाजाने कर्मकांडे त्यागून स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे-मुन्नाभाई नंदागवळी

0
24

: बाराभाटी येथे बिरसा मुंडा जयंती उत्सव साजरा

अर्जुनी मोरगांव : आदिवासी समाज हा निसर्ग पुजक आहे. जंगलात राहणारे नागरिक म्हणजे या देशाचे, समाजाचे रक्षण करणारे समाजाचे नागरिक आहेत. हल, नांगर, जमीन, जल व जंगल या सर्वांचे रक्षण करुन आपली वेगळी ओळख समाजासाठी निर्माण करणारे आदिवासी समाजाचे क्रांतीनायक बिरसा मुंडा यांच्या कार्याने प्रेरित व्हायला पाहिजे. समाजाला दिशाभूल करणारे अंधश्रद्धा, थोतांड व कर्मकांडे यांचा त्याग करून आदिवासी समाजाने आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले. ते जयंती उत्सव कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मंचावर दादाजी चूलपार यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी मनोहर कांबळे, तुलाराम मारगाये, प्रभाकर दहिकर, ज्ञानू प्रधान, धम्मदीप मेश्राम, दिलवर रामटेके, प्रफुल्ल वालदे, भगवान नंदेश्वर, तोताराम गणविर, विलास बंसोड, करुणा नांदगावे, महाराज दादाजी मेश्राम, शंकर धानगाये, सरपंचा सरस्वता चाकाटे, दुधराम घरतकर, हेमराज बेलखोडे, लीलाधर चुटे, यादोराव बेलखोडे, श्रीराम ताराम आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बिरसा मुंडा, माता दंतेश्वरी, विरसिह गेंदलाल नाईक, राणी दुर्गावती, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांना हार अर्पण करून दीपप्रज्वलनाने अभिवादन करण्यात आले. तसेच गावातील व बाहेरगावातील आलेले बिरसा मुंडा जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. अनेक मान्यवर उपस्थितांपैकी मार्गदर्शन केले. अशाप्रकारे सदर जयंती कार्यक्रम तीन दिवसीय असून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आदिवासी समाजातील अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार समारंभ करण्यात आले. पुढे नंदागवळी म्हणाले- आदिवासी समाजाने डोळे झाकून राहू नये, आपली ओळख तयार करावी व स्वाभिमानाने जगावे, असे मौलिक आपल्या वाणीतून उपस्थित आदिवासी समाजातील नागरिकांना ज्ञानाचे मार्मिक डोज पाजले. सदर कार्यक्रम दि.१६ नोव्हेंबर रोजी रात्री ०८.०० वाजता, स्थानिक ठिकाणी बिरसा मुंडा चौक, केजाजी महाराज मंदीराच्या बाजूला बाराभाटी येथे संपन्न झाला. कार्यक्रम प्रास्ताविक राजेश चूलपार यांनी करून संचालन व आभार जागेश्वर आंदे यांनी मानले. तर यशस्वीतेसाठी विजय चाकाटे, संजय चव्हारे, युवराज ताराम, अन्ना ताराम, धर्मेंद्र घरतकर, मेघराज ताराम, लालचंद मारगाये, कमलेश आंदे, कमलेश चव्हारे व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.