तपोवन गावात होतंय पहिल्यांदा मतदान,मतदान केंद्र क्र. १८९ ची स्थापना लोकशाहीचा नवा अध्याय

0
54
वाशिम,दि.२० नोव्हेंबर– जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात तपोवन गावातील नागरिकांनी ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा केला आहे. तपोवन गावात मतदान केंद्र (केंद्र क्र. १८९) स्थापन झाले आहे. हा निर्णय गावातील मतदारांसाठी महत्त्वपूर्ण ठरला असून, लोकशाही बळकट करण्यासाठीचा हा एक मोठा टप्पा मानला जात आहे.
*अधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक*
या यशस्वी उपक्रमासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके तसेच कारंजा-मानोरा विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांच्या प्रयत्नांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांना मतदानाची सोय त्यांच्या गावातच उपलब्ध झाली आहे.
*लोकशाहीचा विजय*
स्वतंत्र मतदान केंद्रामुळे गावातील प्रत्येक मतदाराला आता सहजपणे मतदानाचा हक्क बजावता येईल. विशेषतः महिला, वृद्ध, आणि दिव्यांग मतदारांसाठी ही सुविधा खूपच उपयुक्त ठरणार आहे.तपोवन गावाचा हा आदर्श उपक्रम इतर ग्रामीण भागांसाठीही प्रेरणादायी ठरेल आणि ग्रामीण लोकशाही प्रक्रियेला अधिक बळकटी देईल.हे निश्चित.