अर्जुनी मोर.( सुरेंद्रकुमार ठवरे )अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार इंजि. राजकुमार बडोले हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने आज 20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी आपले वडील राजकुमार बडोले यांना मतदान करण्यासाठी त्यांची मुलगी श्रुती राजकुमार बडोले ह्या थेट लंडनवरून सडक/ अर्जुनी ला पोहोचल्या व त्यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह सडक अर्जुनी येथील मतदान केंद्र क्र.132 मधे मतदान केले.
63 अर्जुनी मोर. विधानसभेची निवडणुक आज दि.२० नोव्हेंबर ला पार पडली.भाजपा,राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार गट, व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून माजी मंत्री राजकुमार बडोले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.आपले वडील निवडुन यावे म्हणुन लंडन मधे उच्चपदस्थ नोकरीवर असणारी राजकुमार बडोले यांची मुलगी डाॅ.श्रृती राजकुमार बडोले ही मतदान करण्यासाठी थेट लंडनवरुन सडक / अर्जुनी ला पोहचली.तर मुलगा स्वप्नील राजकुमार बडोले हा सुध्दा बंगरुळ येथे उच्चपदावर नोकरीला आहे.तर दुसरा मुलगा अनिकेत बडोले हा नागपुर येथे नोकरी करीत असुन बडोले यांच्या सुविद्य पत्नी शारदाताई राजकुमार बडोले ह्या संपूर्ण परिवारांसह सडक/अर्जुनी मतदान केंद्रात मतदान केले.सन 2009, व 2014 या दोन रेझीम मधे राजकुमार बडोले हे अर्जुनी मोर. विधानसभेत भाजपातुन निवडुन आले. 2014 ला ते महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री बनले .मात्र 2019 ला बडोले यांचा अल्पशा मतानी पराभव झाला होता.परंतु पराभवाची नाराजी दुर सारुन बडोले यांनी मतदारसंघात सतत पाच वर्ष जनतेशी नाळ जुळवुन ठेवल्याने त्यांचेबद्दल प्रचंड सहानुभुती व आपुलकी निर्माण झाली होती.अशातच आता महायुतीकडुन बडोले यांनी निवडणुक लढविली. या निवडणुकीत तिन्ही पक्षातील नेते पदाधिकारी,कार्यकर्ते व मतदारांनी मोठ्या प्रमाणात बडोले यांचे काम केल्याने राजकुमार बडोले यांचा विजय निश्चीत मानल्या जात आहे.