तीन पिढ्यांनी केले एकत्र मतदान

0
505

 गोंदिया- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील कमरगाव येथील पारधी कुटूंबाच्या तीन पिढ्यांनी एकत्र मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी आम्ही मतदान केले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. मीरा रुदाजी पारधी (वय 97) यांनी कमरगाव येथील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी त्यांचा मुलगा योगराज पारधी (वय 60) आणि नातू त्रिलोक पारधी (वय 35) यांनीही त्यांच्यासोबत मतदान केले. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून सर्व मतदारांनी मतदान केले पाहिजे, असे मत पारधी कुटूंबियांनी यावेळी व्यक्त केले.