- स्ट्राँग रुममध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त
गोंदिया, दि.22 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी शांततेत मतदान झाले. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील 64 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. या मतपेट्या चारही विधानसभा मतदारसंघातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्राँग रुममधील मतपेटींच्या देखरेखीसाठी पोलीस यंत्रणेचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 63-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी कृषि उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव येथे, 64-तिरोडा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय आयटीआय तिरोडा येथे, 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पॉलिटेक्निक कॉलेज फुलचूर पेठ गोंदिया येथे तर 66-आमगाव विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय आयटीआय देवरी येथे होणार आहे.