=विशाल मिरवणुकीत हजारो कार्यकर्ते सहभागी=
अर्जुनी मोर.-अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार इंजी. राजकुमार बडोले हे आज झालेल्या निवडणूक निकाल 16,415 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनसोड यांचा पराभव केला.
अर्जुनी विधानसभेसाठी आज कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोर.च्या पटांगणात मतमोजणीला सुरुवात झाली एकूण 14 टेबल वरून 23 फेऱ्या घेण्यात आल्या. यामध्ये पहिल्या फेरी पासूनच महायुतीचे उमेदवार राजकुमार बंडोले यांनी विजयाची आघाडी घेतली होती. मतमोजणी मध्ये मशीन मधील व टपाली मतदान पकडून राजकुमार बडोले यांना ८२५०६ मते तर महाविकास आघाडीचे दिलीप बनसोड यांना 66 हजार 91 मते तर प्रहार जनशक्ती संघटनेचे सुगत चंद्रिकापुरे यांना 15428 मते तर काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार अजय लांजेवार यांना 4744 मते तर वंचित बहुजन आघाडीचे दिनेश पंचभाई यांना 5453 मते मिळाली. या मतदारसंघात एकूण एक लाख 83 हजार 242 मतांची मोजणी करण्यात आली. तर उर्वरित उमेदवारांना आपली अमानत रक्कमही वाचवता आलेली नाही. निवडून आल्याचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर नवनिर्वाचित आमदार इंजिनीयर राजकुमार बडोले यांनी सर्वप्रथम तहसील कार्यालया जवळील शहिद गोवारी स्तंभाला विनम्र अभिवादन केले. व तिथून भव्य विजय रॅलीला सुरुवात करण्यात आली. शहराच्या मुख्य मार्गावरून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विजय मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राजकुमार बडोले यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते व सर्व मतदार बंधू आणि भगिनीचे मनापासून आभार मानले