पॉलीसीचे हप्ते थकीत असले तरी मृत्यूपश्चात लाभ नाकारता येणार नाही!

0
61

जिल्हा ग्राहक आयोगाची विमा कंपनीला चपराक

भंडारा : एखाद्या व्यक्तीचे काही कारणास्त विमा पॉलिसीचे मासिक हप्ते थकित असल्यास मृत्यूपश्चात  मिळणारा लाभ विमा कंपनीला नाकारता येणार नसुन संबंधीत व्यक्तीच्या वारसांना मृतकाच्या पॉलीसीचा संपुर्ण लाभ द्यावा लागेल असे आदेश भंडारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले असुन या निर्णयाने विमा कंपनीला चांगलीस चपराक बसली आहे.
तक्रारकर्त्या  रुपाली भुदेव रेहपाडे यांचे पती मृतक भुदेव रेहपाडे हे पाटंबंधारे विभागात कार्यरत होते.दरम्यान   दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ रोजी कोवीड-१९ च्या प्रादुर्भावाने निधन झाले.मृतक भुदेव रेहपाडे यांनी भारतीय जिवन विमा निगम भंडारा तर्फे आधार स्तंभ नावाची पॉलिसी काढली होती  व सदर पॉलिसीचे मासिक हप्ते हे त्याचे शासकीय कार्यालयातून मिळणाºया पगारातुन कपात करण्यात येत होते. दरम्यान काही कारणास्तव मृतकाचे एप्रिल,मे व जून या तीन महिन्याचे विमा पॉलीसीचे मासिक हप्ते थकीत झाले होते.तर जुलै पासुन विमा पॉलीसीचे मासिक हप्ते नियमित भरण्यात आले.
भुदेव रेहपाडे यांच्या मृत्यूपश्चात त्यांची पत्नी रुपाली भुदेव रेहपाडे यांनी विमा पॉलीसीचा लाभ मिळण्याबाबत भारती विमा निगम कार्यालय भंडाराकडे अर्ज सादर केला असता मृतकाच्या पॉलीसीचे तिन मासिक हप्ते थकीत असल्याचे कारण पुढे करून रूपाली भुदेव रेहपाडे यांना मृत्यूपश्चात पॉलीसीचा लाभ देण्यास नकार दिला.
रुपाली भुदेव रेहपाडे यांनी याप्रकरणी भंडारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली. ग्राहक मंचाने याप्रकरणी सर्व लेखी पुरावे व बयाण नोंदवुन घेत किस्त थकीत असल्याने पॉलीसी लाभार्थ्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटंूबियांना लाभा नाकारणे हे चुकीचे असुन भारतीय विमा निगम कार्यालयाने भुदेव रेहपाडे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटूंबियांना विमा पॉलीसीचा संपुर्ण लाभ देण्याचे आदेश दिले असुन सोबतच त्या लाभामधुन मृतकाचे थकीत असलेले तीन मासिक किस्त वजा करण्याचे आदेश ग्राहक मंचाचे अध्यक्ष सतीश आ. सप्रे गणपुत, सदस्या   जयश्री बु. गोपनारायण  व सदस्य पराग मो. सुभेदार यांनी दिले.तक्रारकर्त्यातर्फे  अ‍ॅड.सुखदेवसिह ज.चौहान,अ‍ॅड. संतोषसिंह एस. चौहान, अ‍ॅड. शैलेंद्रसिह एस. चौहान, अ‍ॅड. जयदेवसिंह एस चौहान यांनी बाजु मांडली .