जिल्हाधिकारी कार्यालयात ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा

0
187

गोंदिया, दि.26 : 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली ‘संविधान दिन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सतीश अगडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी आर.जी. मारबते, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक संजय धार्मिक, लेखाधिकारी सीमा वानखेडे, जिल्हा विधी अधिकारी मिलिंद चौरे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

        याप्रसंगी 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ह्यात शहिद झालेल्या जवान व नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

        जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही जोपासणारा देश असून 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतातील प्रत्येक नागरिकांच्या संरक्षणासाठी व त्यांच्या अधिकारासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणजे भारतीय संविधान अंगिकृत करण्यात आले असे त्यांनी यावेळी सांगितले.

       भारताचे संविधान उद्देशिकेचे वाचन जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षक संजय धार्मिक यांनी केले. संविधान दिनाचे औचित्य साधून विधी अधिकारी मिलिंद चौरे यांनी विस्तृतपणे माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा आपत्ती व्यवस्था अधिकारी राजन चौबे यांनी केले.