भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सर्वांनी वाचन केले.
*अर्जुनी मोरगांव :* भारतातील प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्यायाचे तसेच विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासनेच्या स्वातंत्र्याचे आश्वासन देणारे ‘भारताचे संविधान’ ही आपली गौरवशाली ओळख आहे आणि आज त्याच भारतीय संविधाना ला ७५ वर्षे झाली त्याचाच संविधान अमृत महोत्सव अर्जुनी मोरगांव तालुक्यातील खांबी येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडी येथे २६ नोव्हेंबर संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी ग्रा.पं सरपंच निरूपा बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्राम सेविका कावळे मॅडम, ग्रा.पं सदस्या प्रियंका रामटेके, रोजगार सेवक लीलाधर राऊत, अंगणवाडी सेविका दहिवले मॅडम, अशा सेविका कोमल रामटेके, ग्रा.पं संगणक चालक योगेश लोणारे, ग्रा.पं परिचर माणिक खोटेले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी भारतीय संविधान शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्य अर्पण व दिपप्रज्वलन करून अभिवादन करून संविधान प्रास्ताविक वाचन करण्यात आले.