अर्जुनी मोर.-विकास हा न संपनारा विषय आहे.गावांगावात अनेक समस्या व विकासाची कामे आवर्जुन उभी असतात.हा विकास साधण्यासाठी अनेक यंत्रणा कार्यरत आहेत. सध्या पंचायत समीती ,जिल्हा परिषद पासुन महाराष्ट्रासह केंद्रात महायुतीची सरकार आहे.त्यामुळे गावातील सर्वांगीण विकासासाठी आता निधीची कमतरता भासणार नाही. कारण आता विकासाची दालणेच खुली होणार असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे गटनेते व बोंडगाव देवी क्षेत्राचे जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर यांनी केले आहे.
बोंडगांवदेवी जि.प.क्षेत्रातील गटग्रामपंचायत विहीरगांव /बर्ड्या अंतर्गत येरंडी /देवी येथील जि.प.प्राथ.शाळा येथे( ता.1 ) आयोजीत स्वच्छता अभियानांतर्गत शौचालय बांधकामाचे भूमिपूजन प्रसंगी भेंडारकर बोलत होते.सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला माल्यार्पण करुन जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर यांचे हस्ते भुमीपुजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी सरपंच विशाखाताई वालदे होत्या.यावेळी तंमुगांसअ.संजय तवाडे,आनंदराव दोनोडे, देवाजी बहेकार, दादाजी लोगडे, ज्योती उरकुडे, शासअ.रघुजी बहेकार,विश्वनाथ वालदे,गौरीशंकर ब्राम्हणकर, व ग्रामवासी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी लायकराम भेंडारकर यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ईंजी.राजकुमार बडोले यांना भरघोष मतांनी निवडुन दिल्याबद्दल बोंडगांवदेवी जि.प.क्षेत्रातील सर्व मतदार बंधु आणी लाडक्या बहिणींचे आभार मानले.