आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे दिवाळी अंक प्रदर्शनी व स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन शिबिर
गोरेगाव,दि.०१-प्रत्येक व्यक्तीने ग्रंथाचे वाचन करावे आपल्या पाल्यांना सुध्दा ग्रंथ वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सदैव प्रयत्न करावे ग्रंथालयातील ग्रंथ हे वाचकांपर्यंत पोहचले पाहिजे. युवा पिढीने जास्तीत जास्त वेळ हा ग्रंथालयात येऊन ग्रंथाचे वाचन करून येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेत अभ्यास करून यश संपादन करावे असे आवाहन भंडारा जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेन्द्र बोपचे यांनी आदर्श सार्वजनिक वाचनालयाच्या दिवाळी अंक प्रदर्शनी व स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन शिबिरात केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त वनसंरक्षक अधिकारी यु.टी.बिसेन तर प्रमुख अतिथी म्हणून जी.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य राजेंद्र रहमतकर, सेवानिवृत्त प्राचार्य डि.आर.चौरागडे, आजिवन प्रचारक रूपलाल कावडे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन.के.बिसेन,एल.पी.रांहागडाले,उपसरपंच मोहनलाल पटले, पोलिस पाटील राजेश येळे, जिल्हा प्रचारक प्रा. गुणीलाल बघेले ,माजी उपसरपंच श्रीराम पारधी , संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले, उपाध्यक्ष जे. जे. पटले, सचिव सुभाष चौरागडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी ग्रंथाचे वाचन करणे काळाची गरज आहे, ग्रंथ वाचुन च थोर विचारवंत झाले आहेत. या संस्थेचे संस्थापक सचिव स्व. ग्रंथमित्र वाय. डी. चौरागडे गुरूजी यांनी ग्रामीण भागात एक चांगले ग्रंथालयाची स्थापना करून वाचन संस्कृती जोपासण्याचे कार्य केले आहे.चौरागडे गुरूजी मुळेच आज हे ग्रंथालय जिल्हात दुसरें क्रमांकाचे ग्रंथालय असून विद्यार्थ्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयात देऊन ग्रंथाचे वाचन करून आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सदैव प्रयत्न करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्रकुमार चौरागडे यांनी केले.मार्च २५ मध्ये इयत्ता १० वी १२ वीत प्रथम द्वितीय तृतीय येणार्या विद्यार्थ्यांचे ग्रंथालयाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर कार्यक्रमाचे संचालन पद्माकर महाजन यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले यांनी मानले. यावेळी गावातील नागरिक, पालक, वाचक व स्पर्धात्मक परीक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.