अर्जुनी मोर.( सुरेंद्रकुमार ठवरे)-विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या.आता गावांगावात मतांची गोळाबेरीज करणे सुरु झाले आहे.आपला उमेदवार कुठे प्लस व कुठे मायनस झाला.याची कारणे शोधण्याची कार्यकर्ते चर्चा करीत आहे.अर्जुनी मोरगाव विधानसभेतुन महायुतीचे राजकुमार बडोले निवडुन आले.अर्जुनी मोर. तालुक्यात बंगाली बांधवांचे सात वसाहती आहेत.सातही कॅम्पमधुन महायुतीचे उमेदवार ईंजी.राजकुमार बडोले यांना बंगाली बांधु भगिणींनी मोठ्या प्रमाणात मतदान करुन मताधिक्य वाढविले आहे.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात अर्जुनी मोर. तालुक्यात सात बंगाली( कॅम्प) वसाहती आहेत.अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्र अस्तित्वात आल्यानंतर सन 2009 पासुनच या वसाहतीमधे भाजप व मित्रपक्षांचा झेंडा वर राहीलेला आहे.सन 2009 ,2014, व 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सातही बंगाली वसाहतीतील मतदार बंधु भगीणींनी राजकुमार बडोले यांना भरभरुन मतदान केले.
बंगाली वसाहतीत सामुहिक विकासाची कामे बडोले यांनी आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात केली.तसेच नमो शूद्र,प्रापर्टी कार्ड,राशन कार्ड,जातीचे प्रमाणपत्र,असी असंख्य वैयक्तीक व सामाजीक कामे बडोले साहेबांनी केलेली आहेत.या वसाहतीमधे कोणतेही सामाजीक धार्मीक कार्यक्रम असोत.बडोले यांची प्रामुख्याने उपस्थितीती असते.त्यामुळे बंगाली बांधव राजकुमार बडोले यांचेवर जिवापाड प्रेम करुन त्यांना आपला नेता मानतात.2019 ला राजकुमार बडोले यांचा 718 मतांनी पराभव झाला असला तरी सातही बंगाली वसाहती मधील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मते दिली होती.
नुकत्याच झालेल्या या विधानसभा निवडणुकीत सातही बंगाली कॅम्प मधुन मोठ्या प्रमाणात मते मिळाली आहेत. त्यामधे गौरनगर कॅम्प मधील दोन बुथावरुन बडोले यांना 1055 मते,अरुणनगर येथील दोन बुथावरुन 1377 मते,पुष्पनगर अ,आणी ब मधुन 322 मते,दिनकरनगर मधुन 555 मते,तर रामनगर / संजयनगर मधुन 346 मते असे एकुण 3655 मते मिळाली,तर काॅग्रेसचे दिलीप बन्सोड यांना सातही कॅम्प मधुन 1011 मते,प्रहारचे सुगत चंद्रिकापुरे यांना 154 मते तर अपक्ष उमेदवार अजय लांजेवार यांना फक्त 17 मते मिळाली. यामुळे सातही बंगाली वसाहतीमधे राजकुमार बडोले यांना 2644 मतांची आघाडी मिळाली आहे