कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया कार्यक्रमाचे भिष्म पितामह डॉ.अभय पाटील

0
74

निष्णात सर्जन डॉ.अभय पाटील यांचा सेवानिवृत्त सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न

गोंदिया- आरोग्य विभाग जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभय पाटील यांचा सेवानिवृत्त सत्कार समारंभ कार्यक्रम दि.30 नोव्हेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव येथे संपन्न झाला.सदर सेवानिवृत्त कार्यक्रम प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दर्शना नंदागवळी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी त्यात डॉ.आदित्य दुबे,डॉ.अमित गणवीर,डॉ.रुपेष झोडे,डॉ.रजनिष डोंगरे,डॉ.निलिमा म्हसके,डॉ.प्रिती झळके,डॉ.दोनोडे,डॉ.पलस शहारे,डॉ.शिवकुमार हरिणखेडे, डॉ.संगीता भोयर,तालुका आरोग्य सहाय्यक लिलाधर निपाने यांचे सह तिरोडा तालुक्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी त्यांचा पुष्पगुच्च,शाल,श्रीफळ व भेटवस्तु देवुन सत्कार करण्यात आला.
डॉ.अभय पाटील हे आरोग्य विभागात 1994 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम जंगलव्याप्त प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव येथे वैद्यकीय अधिकारी ह्या पदावर रुजु झाले. तेथील गोरगरीब जनतेला 12 वर्ष आरोग्य सेवा देवुन वर्ष 2006 मध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागात बदली होवुन आले.गोंदिया जिल्ह्यात त्यांचा सेवा कार्यकाल सुद्धा सुरुवातीला देवरी तालुक्यातील अतिदुर्गम प्राथमिक आरोग्य केंद्र घोनाडी येथुन सुरु झाला.कालातंराने त्यांची बदली तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव येथे झाली.राष्टीय कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण झाल्यानंतर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रिया शिबीरातुन त्यांनी अनेक यशस्वी पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केल्या. त्यांनी त्यांच्या सेवा कालकिरर्दीत जवळपास दहा हजाराच्यावर पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केल्या आहेत.त्यांच्या ह्या कार्याबद्दल जिल्हा परीषद गोंदियाच्या वतीने दि.11 जुलै 2024 जागतिक लोकसंख्या दिवसाच्या अनुशंगाने जीवन गौरव ह्या पुरस्काराने मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम ह्यांच्य हस्ते सन्मानित करण्यात आले होते.आरोग्य विभागात दहा हजाराच्यावर कुटुंब कल्याण शस्त्रक्रीया केल्याबद्दल कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया कार्यक्रमाचे भिष्म पितामह म्ह्णुन त्यांनी वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे.
गोंदिया जिल्ह्यात जवळपास 18 वर्षाची प्रदीर्घ सेवा काल यशस्वी रित्या पूर्ण करून आरोग्य विभागात निष्णात सर्जन,कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे.दि.30 नोव्हेंबर रोजी डॉ.अभय पाटील सेवानिवृत्त झाल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दर्शना नंदागवळी,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन  अग्रवाल यांनी सेवानिवृत्ती नंतरचा काल निरोगी, आनंदी व आरोग्यमय जावो हिच सदिच्छा देवुन निरोप दिला आहे.