नागपूर:- सत्ता ही देशातील, राज्यातील जाणसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी असतें. परंतु सत्ता ही भाजप व महायुतीतील मंडळीसाठी स्वतःचे घर भरण्यासाठी आहे.यांना राज्यातील, देशातील जनतेशी काहीही देणेघेणे नाही. म्हणूनच विधानसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम (EVM) हॅक करत लोकशाहीचा गळा घोटला. सत्ता मिळविण्यासाठीच भाजपणे देशाच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यामुळे आम्हा सर्वांना रस्त्यावर उतरून ईव्हीएम विरोधात आवाज उचलणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी बोरखेडी (रेल्वे) येथे बोलताना काढले.
तालुक्यातील बोरखेडी (रेल्वे) येथे दि ०१ डिसेंबरला नागपूर पंचायत समितीचे (Nagpur Panchayat Samiti) सदस्य व माजी उपसभापती संजय चिकटे व मित्र परिवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १२ व्या दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार विजय घोडमारे पाटील, नागपूर जी प उपाध्यक्ष कुंदा राऊत, जी प सदस्य उज्वला बोढारे, जी प सदस्य दिनेश बंग, जी प सदस्य वृंदा नागपुरे, खरेदी विक्री सोसायटी अध्यक्ष वसंत कांबळे, प्रकाश हांडे, विष्णू माथनकर, नागपूर पंचायत समिती सभापती रूपाली मनोहर, नागपूर कृषी उपन्न बाजार (Nagpur agricultural products market)समिती सभापती अहमद बाबू शेख ,उपसभापती प्रकाश नागपुरे, ममता बरंगे सह या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती म्हणून रामटेक लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वचित खासदार श्याम बर्वे हे होते. पुढे बोलतांना केदार म्हणाले की, ज्या महाराष्ट्रातील जनतेने चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३२ खासदार निवडून दिले त्या हिशोबाने विधानसभेत १५० च्या वर आमदार निवडून यायला हवे होते. परंतु तसें झाले नाही. मग तुम्ही कसे म्हणता ई व्ही एम घोटाळा नाही? असा खोचक सवाल केदारांनी यावेळी केला. जर अवकाशातील यांनाना आम्ही जमिनीवरून हाताळू शकतो तर कुठल्या इलेक्ट्रॉनिकक्स मशीन ला हॅक करू शकत नाही का?
श्याम बर्वे यांनी भरघोष मतांनी विजय संपादन केल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार
आम्ही निवडणूक हरलो परंतु तुम्ही असे समजू नका की, सुनील केदार आता थकला, घाबरला किंवा पळाला. आम्ही पुन्हा निवडणुका लढू आणि जिंकू असेही ते यावेळी आवर्जून म्हणाले. तत्पूर्वी जून २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदार संघातून खासदार श्याम बर्वे यांनी भरघोष मतांनी विजय संपादन केल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नागपूर पंचायत सदस्य संजय चीकटे व मित्र परिवार यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचालन दिपचंद कांबळे, प्रास्ताविक संजय चिकटे तर आभार देवकी इवानाते यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता बोरखेडी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने योगेश नंदनवार,हरीश फंड,प्रशांत रावळे,नंदुजी कुंभरे,रमेश झकनेकर,गज्जू भुते,प्रशांत देवळे,अजय देशमुख,सूरज नगराळे,संदीप धानोरकर,धीरज हांडे,गजानन ढोके, प्रशांत ढोके,प्रतीक नानवटे,किशोर काकडे,विठ्ठल भोयर,चरण काळे,विठ्ठल भोजने,विष्णू भोजने,देवेंद्र भोजने, मारोती झकणेकर,अंकुश मासरकर,वैभव नागपुरे, चेतन ढोके,गजानना ढोके,राजेंद्र जीवतोडे, प्रकाश उपरे,राजू मिलमिले,शंकर मडावी, मोरेश्वर सातपुते,राम धुर्वे,अरुण इंदुरकर,भास्कर मेहरकुळे,तसेच सर्व गावकरी व परिसरातील नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.