11 डिसेंबरपासून संत लहरी बाबांचा 102 वा जयंती सोहळा

0
94

गोंदिया,दि.२ डिसेंबर-संत श्री लहरी बाबा म्हणून प्रसिद्ध परमपूज्य संत श्री जयरामदास यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त आठवडाभराचा सोहळा 11 ते 17 डिसेंबर दरम्यान साजरा केला जाणार आहे. गोंदियातील संत श्री लहरी बाबा आश्रम संस्थान (मध्यकाशी) कामठा येथे यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.संस्थानचे पीठाधीश परमपूज्य संत डॉ.खिलेश्वर उर्फ ​​तुकडय़ा बाबा आणि अध्यक्ष परमपूज्य गोपाल बाबा सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

11 ते 12 डिसेंबर दरम्यान गोंदिया, भंडारा, बालाघाट, चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेली आंतरजिल्हा भजन स्पर्धा होणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात लहरी प्रार्थना, संत साहित्य ग्रंथ दिंडी, प्रभातफेरी, रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर, ग्रामस्वच्छता मोहीम, श्री लहरी सच्चरित मानसाचे पठण, महामृतंजय यज्ञ, विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा कार्यक्रमांनी होणार आहे. प्रख्यात कीर्तनकार नानिकराम टेंबरे यांचे कीर्तन, तुलसी पंचेश्वर, अजय पटले द्वारा भजन, ललित संगीत, दीपोत्सव, श्री लहरी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, गोपाळकाला व महाप्रसाद होणार आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या लहरी ब्रम्हा साक्षात्कार मंदिराचे उद्घाटनही करण्यात येणार आहे.

खासदार डॉ.प्रशांत पडोळे (गोंदिया-भंडारा), आमदार विनोद अग्रवाल (गोंदिया), आमदार अनुभा मुंजारे (बालाघाट), सरपंच रेखा जगणे, जिल्हाधिकारी प्राजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, माजी मंत्री रामकिशोर कावरे, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, राजेंद्र जैन, हीना कावरे, ॲड. संजय धोटे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिशा पाजई, हिंदू महासभेचे अध्यक्ष मुकेशनाथ महाराज (वर्धा), तिरखेडी आश्रमाचे संत ज्ञानीदास महाराज, भारतीय राखीव बटालियनचे कमांडंट अमोल गायकवाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे, विजय बहेकर, डॉ. नोव्हेल ब्रम्हणकर, डॉ. प्रमेश गायधने, डॉ. पंकज कारेमोरे आदी अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, शेजारील मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि इतर ठिकाणांहून लाखोंच्या संख्येने भाविक जन्मोत्सवाला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.गोविंद बारापात्रे, दिनकर भुसारी, रुस्तम लिल्हारे, विजय खोके, ओम म्हशाखेत्री, सुभाष राजापुरे, संजय धोटे, डॉ. अरुण कुथे, डॉ.मंगेश भालोटिया, रामकृष्ण वाघाडे, लीला लिल्हारे, जैमिनी धावडे, सुनील कुरमभट्टी, गुणवंत जाधव, भारती कुरमभट्टी, अविनाश चौधरी, डॉ.संजय दाणाव, नरेंद्र तपासे, अरुण मते, डॉ.रामेश्वर माने, तुषार सिन्हा, बबलू श्रीवास्तव, वैशाली वैरागडे, मंदा गोन्नाडे, अपूर्व गौरखेडे, सोनाली कुरमभट्टी यांच्यासह लहरी युवा मंचचे सदस्य, संस्थानचे सचिव गोविंद मेश्राम, खजिनदार गोपाल माटे, विश्वस्त मंडळाचे सदस्य संजय तराळ, दीपक कुन्दनानी, विजय सातपुडे, नंदकिशोर सहारे आदी कार्यक्रम यशस्वी साठी प्रयत्नशील आहे.