क्षेत्रातील गावांत विकासाची कामे आणने हीच आपली जबाबदारी :- लायकराम भेंडारकर

0
164

= बोंडगाव देवी जि.प.अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन
अर्जुनी मोर.-बोंडगांवदेवी जि.प.क्षेत्रातील प्रत्येक गावांच्या विकास कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.टप्याटप्याने सर्वच गावात विकासाची कामे करण्यात येणार आहे. क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या वैयक्तिक योजनांसाठी जागृत राहुन लोकप्रतिनीधींच्या संपर्कात रहावे.व आपल्या अडचणी दुर कराव्या,तसेच प्रत्येक गावातील सरपंच तथा ग्रामपंचायत कमेटीने आपल्या गावातील विकास कामासंदर्भात पं.स.व जि.प.सदस्य,तथा स्थानिक आमदार यांना अवगत करावे असे आवाहन गोंदिया जि.प.चे गटनेते,तथा बोंडगांव देवी क्षेत्राचे जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर यांनी केले.
बोंडगावदेवी जि.प.क्षेत्रातील विविध गावांत ता.2 विकास कामांचे भुमीपुजन प्रसंगी ते बोलत होते.
बोंडगाव देवी जिल्हा परिषद क्षेत्रातील अरततोंडी येथील सिमेंट नाली बांधकाम, चान्ना बाक्टी येथील ९५०५ अंतर्गत रस्ते बांधकाम २० लक्ष रुपये,२५/१५ अंतर्गत रस्ता बांधकाम ६ लक्ष रुपये,घुसोबाटोला येथील शाळेत शौचालय बांधकाम ३लक्ष रुपये,सिलेझरी येथील ९५०५ अंतर्गत रस्ता बांधकाम १० लक्ष रुपये, जिल्हा परिषद ३०:५४ अंतर्गत रस्ता बांधकाम १० लक्ष रुपये,२५/१५ दुर्गा माता देवस्थान सभामंडप बांधकाम ५लक्ष रुपये इत्यादी कामांचे भूमिपूजन लायकराम भेंडारकर गटनेते तथा सदस्य जिल्हा परिषद गोंदिया यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सौ.कुंदाताई लोगडे सदस्या पंचायत समिती अर्जुनी मोरगाव, संदिप कापगते सदस्य पंचायत समिती अर्जुनी मोरगाव यांच्या अध्यक्षतेखाली, प्रदिप कांबळे सरपंच अरततोंडी, छगन पातोडे उपसरपंच अरततोंडी, डॉ.सचिन डोंगरे सरपंच चान्ना, मोरेश्वर सोनवणे उपसरपंच चान्ना,सौ.लताबाई भेंडारकर सरपंच सिलेझरी, सुखदेव मेंढे उपसरपंच सिलेझरी, पंढरीजी लोगडे,अरुणजी गजापुरे, भागवत लंजे, रघुनाथ शेंडे, तुकाराम शेंडे, मोरेश्वर रहेले, शेषराव पातोडे,गिताताई ब्राम्हणकर, मधुकर तरोणे, युवराज ब्राम्हणकर, पुरुषोत्तम डोये, यशवंत भेंडारकर, संजय भेंडारकर,तेजराम मेंढे, शाहारेजी, घनश्याम गभणे, मुकेश मेंढे,लेकराम हेमणे, मेंढे जी, शालुताई मेंढे पोलिस पाटील व मान्यवर मंडळी ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.