सडक अर्जुनी.–नीलकमल स्मृती फॉउंडेशन सडक अर्जुनीच्या वतीने जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (ता. 3) नीलकमल स्मृती प्रीत्यर्थ आयोजक आर. व्ही. मेश्राम व आयोजिका प्रज्ञा मेश्राम यांच्या कडून जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा सडक अर्जुनी येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना सडक अर्जुनी केंद्राचे केंद्र प्रमुख जी. जे. कापगते यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. एम. के. कावळे, अपंग समावेशित विशेष शिक्षिका रंजू डोंगरे, शिक्षिका कु.एस. एम. चाचेरे,कु. के.आर. भोयर, कु. व्ही. बी. वासनिक, आयोजक आर. व्ही. मेश्राम व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.