चंदीगड:-पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर येत आहे. अमृतसरमध्ये ही घटना घडली आहे. सुखबीर सिंह यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र सुदैवाने ते या हल्ल्यात सुखरुप बचावले आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिर परिसरात हा गोळीबाराचा थरार घडला. या हल्ल्यातून बादल हे थोडक्यात बचावले असून गोळीबार करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल अमृतसर येथील स्वर्ण मंदिराच्या बाहेर दरबान (सुरक्षारक्षक) म्हणून शिक्षा भोगत आहेत.
त्याचवेळी हल्लेखोर तिथे आला आणि त्याने बादल यांच्यावर पिस्तूल रोखली. हल्लेखोराने पिस्तूल रोखताच बादल यांच्या भोवती असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरलं तर, काहींनी हल्लेखोराला पकडले. मात्र, हल्लेखोराने तरीही गोळ्या झाडल्या. सुदैवाने सुखबीरसिंग बादल हे सुखरुप बचावले आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडील पिस्तूलदेखील जप्त केली आहे. आरोपीचे नाव नारायण सिंह असल्याचं म्हटलं जात असून तो दल खालसाशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. मात्र सुवर्णमंदिरात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून ही सुरक्षेत मोठी चूक असल्याचे बोलले जात आहे.