महायुतीची सरकार स्थापन झाल्याचा नवेगावबांध मध्ये जल्लोश

0
30

अर्जुनी मोर.–. मुंबई येथील आझाद मैदानावर आज तारीख.5 महायुती सरकारचा ऐतिहासिक शपथविधी सोहळा पार पडला.यामधे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीपदी अजीत पवार,व एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली.महायुतीची सरकार स्थापन होवुन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबद्दल नवेगावबांध येथील भाजप कार्यकर्त्यांनी टि पॉईंट चौकात फटाके फोडुन व मिठाई वाटून जल्लोश साजरा केला.
तालुक्यातील नवेगाव बांध येथे  दि.05.डिसेंबर 2024 ला ना. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच त्यांच्या शपथ विधी सोहळ्यात आपण प्रत्यक्ष सहभागी होऊ शकलो नाही पण अप्रत्यक्ष सहभागी होऊन नवेगाव बांध येथील टी पॉइंट येथे जि.प.सदस्या सौ. रचणाताई गहाने याच्या नेतृत्वात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला आणि या वेळी
मोदी है तो मुंनकिन है . ऐक है तो सेफ है असे नारे देऊन स्थानिक कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून शपथ विधीचा जल्लोष साजरा करण्यात आला .
या वेळी स्थानिक नवल चांडक, रेशीम कशीवार, जयंत लांजेवार, नवीन ऊके, कोमल डोंगरवार, अशोक हांडेकर ,मदन बावनकर, विजयसिंह ठाकूर ,प्रेम लांजेवार, सुनिता कावळे, महादेव बोरकर, खुशाल काशीवार, मारुती हटवार, आणि इतर कार्यकर्त्यांनी आणि लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन विजयाचा जल्लोष साजरा केला.