खोडशिवणी ग्रा.पं. येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन!

0
44

सडक अर्जुनी,दि.०८ : तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय खोडशिवनी येथे सरपंच गंगाधर परशुरामकर यांच्या अध्यक्षतेखाली महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सडक अर्जुनी चे सदस्य डॉ. आर. बी. वाढई, उपसरपंच सत्यवान नेवारे, सदस्य आशिष टेंभूरकर, उध्दव परशूरामकर, शिलास मेश्राम, सुरेश परशुरामकर, देवेंद्र कावळे, छाया खोब्रागडे, दर्शना टेंभूरकर तसेच ग्रा.पं. कर्मचारी निंबराव वरकडे, कैलाश नेवारे, श्रीकांत लंजे, गुरुचरण टेंभुरणे, व इतर नागरिक उपस्थित होते.यावेळी सरपंच परशुरामकर यांनी उपस्थितांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवनयात्रेवर माहिती दिली.