आमगाव 08 डिसेंबर : तालुक्यातील माल्ही येथील शेतकरी मिलिंद देवराज बिसेन यांच्या शेतातील एचएमटी जातीच्या धानाचे पूंजणे 07 डिसेबंरच्या रात्री अज्ञाताने आग लावल्याने जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.यामुळे शेतकऱ्याचे जवळपास 70 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.शासनाने झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी तलाठी लाडे, बीट जामदार उके,राजीव फुंडे,कमलेश कोडापे, राजेश मानकर उपस्थित होते. आगीवर नियंत्र करण्यात आले, मात्र तो पर्यंत धानाची गंजी ( पुंजणा) संपूर्ण जळून नष्ट झाले. यावेळी घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.