मोहिमेदरम्यान शिबिराप्रसंगी मोफत एक्स-रे तपासणीवर भर
जिल्ह्यातील क्षय रुग्णांना फूड बास्केटचे वितरण
गोंदिया,दि.०८– सार्वजनिक आरोग्य विभाग गोंदिया व जिल्हा क्षयरोग केंद्र यांच्या एकत्रित सहाय्याने के.टि.एस. शासकिय रुग्णालय येथील जिल्हा क्षयरोग केंद्रासमोरील भागात जिल्हास्तरीय शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत रुग्णशोध मोहिमेचे उद्घाटन संपन्न झाले.जिल्हाधिकारी प्रजित नायर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांच्या मार्गदर्शनीय शंभर दिवसीय टीबी रुग्णशोध मोहीमेचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळेस सर्वात प्रथम टिबी मायक्रोबँक्टेरीयम जंतुचे शोध जनक डॉ.रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.ह्यावेळी मान्यवरांच्या हस्ते 100 दिवस मोहिमेदरम्यान करण्यात येणारे एक्स-रे व्हॅनला हिरवी झेंडी देवुन उद्घाटन सुद्धा करण्यात आले.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.त्यानी भारत सरकारच्या महत्वाकांक्षी धोरणानुसार सन २०२५ पर्यंत टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत टिबी वर मात करण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातुन समाजातुन टीबी हद्दपार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.त्या दृष्टीने देशभरातील ३४६ जिल्हयामध्ये शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत रुग्णशोध मोहिम दि. ७ डिसेंबर २०२४ पासुन सुरु करण्यात येत असल्याचे सांगितले.भारतात सन २०२३ मध्ये एकूण २५ लक्ष नविन क्षयरुग्णांचे निदान झाले. तसेच सन २०२३ मध्ये ३ लक्ष क्षयरुग्णांचा मृत्यु झाला. क्षयरोगाचा प्रसार थुंकीद्वारे एका रुग्णापासुन दुस-याला होत असतो.क्षयरोग हा मायक्रोबॅक्टोअिम ट्युबरक्युलोसिस नावाच्या या जंतुमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यावर क्षयरोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. क्षयरोग प्रसाराचे प्रमाण कमी करणे व मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने सन २०२५ पर्यंत देश क्षयमुक्त करण्यासाठी दि. ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ पर्यत १०० दिवसीय क्षयरोग मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.या मोहिमेत निक्षय शिबिराद्वारे समाजातील अतिजोखमीच्या लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार असुन त्यामध्ये २ आठवडेपेक्षा जास्त दिवसाचा खोकला, मंदावणे, वजन कमी होणे, छातीत दुखणे, संध्याकाळी येणारा हलका ताप, थुंकीवाटे रक्त पडणे, पुर्वी क्षयरोग झालेले क्षयरोग बाधित रुग्णाच्या सहवासीत, एचआयव्ही बाधित रुग्ण, कुपोषीत व्यक्ती, ६० वर्षावरील व्यक्ती, मधुमेह बाधित, धुम्रपान करणारे व्यक्ती यांची क्षयरोगाबाबतची तपासणी करावयाची आहे. तपासणी अंती निदान झालेल्या क्षयरुग्णास औषधोपचार मोफत देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत सर्व क्षयरुग्णांना सामाजिक संस्था, सन्माननीय व्यक्ती यांनी दत्तक घ्यावे व त्यांना पोषण आहार किट देण्याबाबत आवाहन केले. क्षयरोगबाधित सहवासाची सिवायटिबी ची चाचणी करुन त्यांना क्षयरोग होण्यापासुन टाळण्यासाठी १२ आठवडे ( आठवडातुन एकदा ) औषधी दिल्या जात असल्याचे सांगितले.
सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी टीबी मुक्त भारत व टीबी रुग्ण शोध मोहिमे मध्ये आरोग्य कर्मचारी व विशेषतः ग्रामपातळीवरील आशांचे योगदान व महत्त्व विशद करून त्यांना प्रोत्साहित केले.मोहिमे दरम्यान विविध विभागांनी क्षयरोगाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन केले.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी बालकांमधील क्षयरोग संसर्ग ओळखण्यासाठी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात चाचणी सुविधा उपलब्ध झाली असुन आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्षय रुग्णांना फूड बास्केट चे वितरण करण्यात आले.तसेच जिल्ह्यातील टिबी चॅम्पियन यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल,जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे, जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात,जिल्हा मौखिक अधिकारी डॉ.अनिल आटे,कुष्ठरोग विभागाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.भाग्यश्री गांवडे,गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव, युनायटेड हॉस्पीटलचे सर्जन तथा निक्षयं मित्र डॉ.सचिन केलंका,कुंभारे नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कोठारी व डॉ.शिवानी कlपगते, क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे व डॉ.देव चांदेवार, जिल्हा पीपीएम समन्वयक प्रज्ञा कांबळे यांचेसहीत हरिष चिंधालोरे, उर्मिला बघेले,पवन वासनिक, आकाश चुंने, योगिता अडसड, रोशन भैशारे,टिबी चॅम्पियन मोहमद अख्तर तसेच आशा सेविका, गट प्रवर्तक, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,एक्स-रे टेक्निशियन, फार्मासिस्ट,पीपीएसए प्रकल्प स्टॉफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.अभिजीत गोल्हार, सुत्रसंचालन पवन वासनिक तर आभार प्रदर्शन डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा पीपीएम समन्वयक प्रज्ञा कांबळे यांनी मोलाची कामगिरी केली.