गोंदिया-अनेक महिलांना अनपेक्षित गर्भधारणा टाळण्यासाठी कायमस्वरूपी मार्ग हवा असतो तर काही महिलांना कुटुंब नियोजनानंतर कायमस्वरूपी पण सुरक्षित गर्भनिरोधक पद्धतीची गरज असते अशा महिलांसाठी ट्यूबेक्टॉमी किंवा ट्यूबल नसबंदी चा पर्याय उपलब्ध आहे. ट्यूबेक्टॉमी किंवा ट्यूबल नसबंदी ही भारतातील गर्भनिरोधक पद्धत पूर्णपणे सुरक्षित,प्रभावी आणि कायमस्वरूपी पद्धत असुन जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात मोफत करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत दि.26 नोव्हेंबर रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथे संपन्न झाले.त्यात 24 महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ.शहजादा राजा यांनी दिली आहे.सफल शस्त्रक्रिया सर्जन डॉ.किर्ती चुलपार व डॉ.शुभम बिसेन यांनी केल्या.
शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी होण्याकरिता गोंदीया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव व प्राथमिक आरोग्य केंद्र खमारीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शहजादा राजा व त्यांच्या टिमच्या उत्कृष्ट नियोजनामुळे पार पडले.
शिबिरा प्रंसगी सर्व कर्मचार्यांचे कामाचे नियोजन जबाबदार्या सोपविण्यात आले होते. त्यात आरोग्य सेविका,आरोग्य सहायीका,स्टाफ नर्स,आशा सेविका,आरोग्य सेवक,आरोग्य सहाय्यक,परिचर,फार्मासिस्ट, समुदाय आरोग्य अधिकारी यांनी चोख भुमिका निभावली.
शस्त्रक्रिया शिबिर वैद्यकीय अधिकारी डॉ.शहजादा राजा, आरोग्य सहायीका भुरे, आरोग्य सहाय्यक तवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडले.