महापुरुषांच्या विचारावर चालणारे खाईत पडत नाही-संतोष खोब्रागडे

0
44

गोंदियात संत जगनाडे जयंती उत्साहात

संतांचे विचार घरा घरात पोचविन्याचा बसपाचा निर्धार

गोंदिया ता. 9 डिसेंबर :-संतांची लढाई प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध होती.संत महापुरुषांच्या विचारांची नितांत गरज आहे, कारण महापुरुषांच्या विचारावर चालणारे खाईत पडत नाही असा ठाम विश्वास तेली समाज संघटनेचे अध्यक्ष आणि बहुजन समाज पक्षाचे कोषाध्यक्ष संतोष खोब्रागडे यांनी व्यक्त केला.
येथील तहसील कार्यालयासमोर आयोजित संत शिरोमणी जगनाडे महाराजांच्या 400 व्या जयंती निमित्त श्री खोब्रागडे अध्यक्ष पदावरून बोलत होते. हा कार्यक्रम बहुजन समाज पक्षाच्या वतीने(ता. 8) आयोजित करण्यात आला.
मंचावर कमलेश बावनकुळे, जांभुळकर, नानाजी शेंडे, पंकज वासनिक, नरेंद्र मेश्राम, उपस्थित होते.पुढे बोलताना श्री खोब्रागडे म्हणाले की विषमतावादी समाजव्यवस्थेने तेली समाजाचे 12.5 जातीमध्ये विभाजन केले . संत महापुरुषांचीही जातीजातीत विभागणी केली.ज्यानी ज्यांनी पाखंड, अंधश्रद्धा, जातीभेद यावर वार केलं त्यांना वारकरी म्हणतात अशी व्याख्या त्यांनी केली. बहुजन समाज पक्षाच्या वतीने महापुरुषांचे विचार घरा घरात पोचविण्याचा निर्धार त्यांनी याप्रसंगी केला.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले.
श्री नूरलाल उके यांनी, बहुजन हृदयसम्राट कांशीराम साहेबांनी 108 महापुरुषांच्या विचाराचा अभ्यास करून त्यांनी आम्हाला संतांच्या विचारांची विरासत मिळवून दिली. श्री पंकज नागदेवे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे मिशन म्हणजे जगनाडे महाराजांचे मिशन होय.ते पुढे म्हणाले की,संत जगनाडे महाराजांची डाक तिकीट प्रसिद्ध करण्याच्या बढाया मारणाऱ्या सरकारने तिकीट प्रसिद्ध केली नाही.यावर त्यांनी हल्ला चढवीला. मंगेश गोंडाने म्हणाले संत महापुरुष हे कोण्या एका जातीचे नसतात. नानाजी शेंडे म्हणाले की, या देशात घडलेल्या सर्व घोटाळ्यामध्य इतिहास घोटाळा मोठा होय. कारण मनुवाद्यांनी खोटा इतिहास लिहून आमच्या महापुरुषांचा अपमान केला.यामुळेच आम्ही 400 वर्षांनतरही संताजींची संतवानी समजु शकलो नाही.तुकाराम महाराजांच्या गाथा बुडविण्यात आल्या असल्या परंतु त्यांचे अभंग हे जगनाडे महाराजांना मुखाग्र होते म्हणून आम्ही त्यांचे विचार जाणू शकलो. संत तुकाराम महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत जगनाडे महाराज हे शिष्य होते. म्हणून ते गुरुभाऊ होते असे ते म्हणाले.नरेंद्र मेश्राम म्हणाले की,महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवा.फक्त त्यांना निवडणुकीतच आमच्या महापुरुषांची आठवण येते. संत जगनाडे महाराज आम्हाला 400 वर्षानंन्तर समजले यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.याप्रसंगी श्री जांभुळकर आणि बावनकुळे यांनीही आपले विचार मांडले.
कही हम भूल न जाये या अंतर्गत समाज जण जागरण अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान येत्या 28 डिसेंबर पर्यन्त संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात सुरु राहणार आहे.कार्यक्रमाचे संचालन मनोज मेश्राम यांनी तर आभार तेज राज यांनी मानले. यावेळी मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.