देवरी,दि.०९ – स्थानिक देवरी येथील छत्रपती शिवाजी संकुल येथे काल रविवारी (दि.०८) “संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती” साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देवरी येथील कृष्णा सहयोगी शिक्षण संस्थेचे प्रमुख झामसिंग येरणे हे होते.र प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्राचार्य सागर काटेखाये, ॲडव्होकेट पुष्पकुमार गंगबोईर, हे होते. याप्रसंगी अनिलकुमार येरणे, जयश्री येरणे, मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम माँ शारदा व संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक सागर काटेखाये यांनी आपल्या मार्गदर्शनातून “संतांनी जातीपातीचा विचार न करता माणुसकी जपली व समाजप्रबोधन केले त्याचप्रमाणे आपणही संत जगनाडे महाराज यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन समाजाचे देणे फेडले तेव्हाच त्यांची जयंती साजरी करण्याचा उद्देश सार्थकी लागेल”. अशाप्रकारे उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षांनी संत जगनाडे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मनोज भुरे यांनी केले. सूत्रसंचालन एस. टी. मेश्राम व आभारप्रदर्शन जी. एम. काशीवार, यांनी केले.