आता लागलेले निकाल नंतर बदलणार-राजकुमार पुराम

0
204

■ देवरी येथे तालुका कांग्रेस पक्षाची निवडणुक संबंधात समिक्षा बैठक.

देवरी,दि.०९: नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा पराभव झाला तरी यात खचून जाऊ नका. या निवडणुकीत ज्या शक्तीच्या विरोधात आपण मुकाबला केला हेच आपले यश आहे.आपल्याकडे संघटनात्मक ताकदीचे मोठे बळ असून, आता लागलेले निकाल नंतर बदलणार असल्याचे मत कांग्रेस पक्षाचे आमगावं-देवरी विधान सभेचे पराभुत उमेदवार राजकुमार पुराम यांनी देवरी येथे शासकिय विश्रामगृहात तालुका कांग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवार (दि.०५ डिसेंबर) रोजी आयोजीत निवडणुक संबंधात समिक्षा बैठकीत नोंदविले.
काँग्रेसच्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत देवरी तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप भाटिया यांनी या बैठकित विधानसभेसह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. हरियाणा आणि महाराष्ट्रातील निकालांमुळे कधीकाळी सर्वाधिक मोठा पक्ष असलेला काँग्रेस आता अगदी रसातळाला गेल्याचं चित्र आहे. काँग्रेसची पीछेहाट होण्याची कारणं काय? आगामी काळात काय करणं गरजेचं आहे? आदी मुद्द्यांवर कांग्रेस पक्षाच्या बैठक समिक्षा झाली
देवरी येथील शासकिय विश्रामगृहात आयोजित केलेल्या निवडणूक संबंधातील समिक्षा बैठकित राजकुमार पुराम म्हणाले, “कांग्रेस पक्ष संघर्षातून उभी राहिली आहे.त्यामुळे कांग्रेस पक्ष यश आणि अपयशाची कधीच पर्वा करीत नाहीत.”
ही बैठक तालुका कांग्रेस चे अध्यक्ष संदीप भाटीया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी कांग्रेस पक्षाचे उमेदवार राजकुमार पुराम,कांग्रेस पक्षाचे युवा नेते अडँ. दुष्यंत किरसान, मोतीलाल पिहदे, चैनसिंग मडावी,बाबुराव हिडको, जीवन सलामे, पं.स.सदस्य रंजीत कासम प्रल्हाद सलामे, शहर अध्यक्ष कुलदिप गुप्ता, नंदकिशोर बारसे, श्री माटे, महिला सामाजीक कार्यकर्ता वैशाली राजकुमार पुराम यांच्यासह तालुक्यातील कांग्रेस पक्षातील बहुसंख्य कार्यकर्ता आवर्जून उपस्थित होते.
या बैठकीचे संचालन अविनाश टेंभरे यांनी तर उपस्थितांचे आभार ओमप्रकाश रामटेके यांनी मानले.