=परिसरातील पक्षीप्रेमी मध्ये आनंद.=
अर्जुनी मोर.( सुरेंद्रकुमार ठवरे )–‘ल्यूना मॉथ’ या अतिशय सुंदर असलेल्या निशाचर प्रजातीच्या पतंगाचा अधिवास नवेगावबांध परिसरातही आढळून आला आहे.बोर व्याघ्र प्रकल्पात हा पतंगाचा अधिवास असल्याचे वृत्त आहे.
वैविध्यपूर्ण निसर्गाची पखरण असलेल्या विविधांगी जैवविविधता असलेल्या नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान,नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात तसेच कोअरझोन मध्ये ‘ल्यूना मॉथ’ चे अस्तित्व आढळून आले आहे.
‘ल्यूना मॉथ’ प्रकारचे फुलपाखरू अल्पायुषी असते.त्याच्या जीवनातील एकमेव उद्देश पुनरुत्पादन हा आहे. हे येथे उल्लेखनीय आहे.
त्यांच्या शरीराच्या पुढच्या बाजूस असणारे सुरवंट पानाप्रमाणे दिसतात. पतंगावर चार डोळ्यांचे ठिपके भक्षकांना गोंधळात टाकतात. पतंगाच्या लांब शेपट्यादेखील वटवाघूळ शिकार करण्यासाठी वापरत असलेल्या प्रतिध्वनीमध्ये व्यत्यय आणू शकतात. इतर अनेक रेशीम पतंगांप्रमाणे हा पतंग आहार घेत नाहीत कारण त्यांच्याकडे पचनसंस्था नसते.
‘ल्यूना मॉथ’ या निशाचर प्रजातीच्या पतंगाला ‘ऍक्टियास ल्यूना’ असेही म्हणतात. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात जास्त प्रमाणात फुलपाखरू, कीटक, हे येथील कोअर झोन क्षेत्राबरोबरच नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या व नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या अभयारण्य क्षेत्रात पहावयास मिळतात.पण, ल्यूना पतंग क्वचितच दिसतात. विशेष म्हणजे त्यांचे आयुष्य केवळ सात ते दहा दिवसांचे असते. शिवाय ते रात्री उडतात. या पतंगाला लांब वक्र शेपूट असते. पंख फिकट हिरवे असतात.
पतंगामध्ये रेशमी पतंग, आंधळा पतंग, देवदूत पतंग, केसाळ पतंग, असे प्रकार पहावयास मिळतात.हा पतंग क्वचित पहावयास मिळतो. त्यामुळे परिसरातील पक्षी व निसर्ग प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आपल्या परिसरात व राष्ट्रीय उद्यान किंवा व्याघ्र प्रकल्पाच्या अभयारण्यात अधिवास असलेले दुर्मिळ पतंग ही आपल्या नवेगावबांध परिसरातील वनवैभव समृद्ध करते.याचा आनंद होतो.
– पक्षीप्रेमी किशोर चांदेवार,नवेगावबांध.
ल्यूना मॉथ’ किंवा ‘ऍक्टियास ल्यूना’ हे निशाचर प्रजातीच्या पतंग बोर प्रकल्पात आढळल्याचे वृत्त मी एका वर्तमानपत्रात वाचले.हा पतंग मला आमच्या पोलीस ठाण्याच्या बागेत देखील आढळला.मी जेव्हा सूक्ष्म निरीक्षण केले तेव्हा तो हाच ‘ल्यूना मॉथ’ आहे, हे कळले.असे दुर्मिळ पतंग पोलीस ठाण्याच्या बागेत आहे.याचा आपल्याला अभिमान व आनंद वाटला.
– योगिता चाफले,ठाणेदार.पोलीस ठाणे, नवेगावबांध.