गोंदिया,दि.१३ःगोंदिया जिल्हा परिषदेच्या सामान्य विभागात नव्याने रुजू झालेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी फनेंद्र कुत्तीरकर यांचे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेकडून स्वागत करण्यात आले.तसेच ग्रामपंचायत अधिकारी वर्गाच्या समस्यावर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत सामान्य प्रशासन विभागाचे महत्वपूर्ण उपमुख्य कार्यकारी पद रिक्त होते. या रिक्त पदावर श्री कुत्तीरकर यांची बदली द्वारे पदस्थापना झाली असून ते रुजू झाले.प्रसंगी गोंदिया जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांचे नेतृत्वात संघटनेच्या शिष्टमंडळाने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत कार्यरत सर्व विभागाच्या कर्मचारी यांच्या सेवा विषयक बाबी तसेच विविध प्रलंबित समस्या मार्गी लावण्याच्या उद्देशाने आपण कार्य करणार असल्याचे आश्वासन कुत्तीरकर यांनी दिले. संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी शासनाच्या विविध योजना लोकाभिमुख करण्यासाठी आपण पूर्णपणे प्रशासनाला सहकार्य करण्याची व जिल्हा परिषद च्या सर्व योजना ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. सदर शिष्ट मंडळामध्ये ग्रामपंचायत अधिकारी संघटना जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन, सरचिटणीस कुलदीप कापगते, उपाध्यक्ष सचिन कुथे, पदाधिकारी भारती वाघमारे, शैलेश परिहार, योगेश रुद्रकार, योगराज बिसेन, रजनी सहारे, रामेश्वर जमाईवार, रितेश सहारे, सुरेश वाघमारे, टिकाराम जनबंधू, प्रदीप ठाकरे, किशोर आचले, नरेंद्र गोमासे, नम्रता रंगारी, ओ. जी बिसेन, हंसराज गजभिये, मुन्ना बीसेन, अजय रामटेके, तारेस कुबडे, दीपक फुले, रवी अंबाडे, निशिकांत मेश्राम, गायक कुमार ठाकूर सौरभ अग्रवाल ईत्यादी उपस्थित होते.