देसाईगंज येथिल न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 46 प्रकरणाचा सामोपचाराने निपटारा

0
47

एकुण 3 लाख 9 हजार 776 हजार रुपयांचा दंड वसूल

गडचिरोली ( विष्णू वैरागडे)-राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्या आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती देसाईगंज न्यायालय अंतर्गत खटला पुर्व प्री लिटीगेशन प्रकरण, नियमित दिवाणी व फौजदारी प्रकरणात अर्जदार व गैरअर्जदार यांच्यातील वाद समोपचार व सलोख्याने मिटविण्यासाठी आज ता 14 डिसेंबर २०२४ ला सकाळी १०.३० वाजता तालुका दिवाणी न्यायाधिश, कनिष्ट स्तर देसाईगंज वडसा येथिल मध्यस्थी केंद्रात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते.

या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये प्री लिटीगेशनच्या ८ नियमित फौजदारी खटला तसेच दिवाणी प्रकरणाचे ३८ मामले असे एकुण ४६ प्रकरणांचा समोपचार व सलोख्याने मिटविण्यात येऊन निपटारा करण्यात आला असून यात ३ लाख ९ हजार ७७६ रुपये वसूल करण्यात आले आहे.सदर राष्ट्रीय लोक अदालतीला दिवाणी व फौजदारी न्यायालय देसाईगंजचे न्यायाधिश सतीश गोरे, पॅनल अधिवक्ता म्हणून ॲड दत्ता पिलारे प्रामुख्याने उपस्थित होते. या लोक अदालतीमध्ये ॲड संजय गुरू व अन्य सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन यशस्वी करण्यासाठी देसाईगंज न्यायालयातील वरिष्ठ लिपिक चेतन भुर्रे, कनिष्ट लिपीक प्रविण माटे, कनिष्ठ लिपीक , मिलींद तिलमलवार कनिष्ट लिपीक सौ.आर आर परसा,शिपाई एस एल दोनाडकर,

या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा देसाईगंज, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा देसाईगंज व शंकरपुर , बँक ऑफ इंडीया शाखा देसाईगंज, युनियन बँक ऑफ इंडीया शाखा देसाईगंज, आयडीबिआय बँक शाखा देसाईगंज, कुरुड, सावंगी, संस्कार को-ऑपरेटीव्ह बँक शाखा देसाईगंज, गृहलक्ष्मी को ऑपरेटीव्ह बँक शाखा देसाईगंज व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उपविभागीय कार्यालय देसाईगंज यांच्या सह अर्जदार व गैरअर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.