38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ परभणी येथील घटनेचा तीव्र निषेध :सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशीची भाकपची मागणी

परभणी येथील घटनेचा तीव्र निषेध :सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशीची भाकपची मागणी

0
98

blank

गोंदिया,दि.१७ः परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर असणाऱ्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीचा अपमान करणार्या घटनेचा निषेध नोंंदवत पोलीस कोठडीत मृ्त्यू पावलेल्या सूर्यवंशीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय कम्युनिष्ट पार्टीच्यावतीने आज मुख्यमंत्री यांच्या नावे उपविभागीय अधिकारी मार्फेत देण्यात आले.

शिष्टमंडळात कॉ. हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, रामचंद्र पाटील, करुणा गणवीर, प्रल्हाद उके, परेश दुरुगवार, घनश्याम गजभिये आदींचा समावेश होता.सादर निवेदनात परभणी येथील जिल्हाधिकारी कचेरी समोरच असणाऱ्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीचा अपमान करणारी निषेधार्थ घटना घडली. आणि या घटने मुळे तीव्र प्रतिक्रिया उमटण्याच्या विरुद्ध निषेध आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र प्रशासने गांभीर्याने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळली नाही व पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच आंदोलनाला गालबोट लागले.पोलिसांनी बेकायदेशीर दलित वस्त्यांना टार्गेट करीत धरपकड व मारझोड करीत अटकसत्र चालविले.यात अनेक निरपराधांना देखील भरडून काढले.पोलिसांच्या अत्याचाराच्या कार्य पद्धतीनेच सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला.या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण घटनाक्रमाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग नेमून चौकशी करणे,मय्यत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबास 25 लाख रुपये नुकसान भरपाई व आर्थिक मदत देणे,हिंसाचारातील नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत, कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात बेजबाबदार व्यवहार करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कार्यवाही करणे तसेच निरपराध व्यक्ती विरुद्ध लावलेले खोटे खटले रद्द करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टीने केली आहे

blank